agriculture news in Marathi, Farmers in mawal attracted on indrayani rice production, Maharashtra | Agrowon

मावळातील शेतकऱ्यांची इंद्रायणी भाताला पसंती
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

कामशेत, जि. पुणे ः मावळ तालुक्‍याची ओळख असलेला आणि आंब्याच्या मोहराप्रमाणे सुगंध असणाऱ्या आंबेमोहर तांदळाचे उत्पादन संपुष्टात आले आहे. खवय्यांच्या चवीला उतरलेल्या इंद्रायणीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. फुले समृद्धीही ग्राहकांच्या पसंतीला उतरू लागली आहे.  

कामशेत, जि. पुणे ः मावळ तालुक्‍याची ओळख असलेला आणि आंब्याच्या मोहराप्रमाणे सुगंध असणाऱ्या आंबेमोहर तांदळाचे उत्पादन संपुष्टात आले आहे. खवय्यांच्या चवीला उतरलेल्या इंद्रायणीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. फुले समृद्धीही ग्राहकांच्या पसंतीला उतरू लागली आहे.  

पुणे जिल्ह्यात पूर्वीपासून मावळ, मुळशी, भोर, वेल्हे या चारही तालुक्‍यांत होणाऱ्या पावसामुळे येथील भात हे मुख्य पीक. पूर्वीपासून या तालुक्‍यांत आंबेमोहरचे उत्पादन व्हायचे. परंतु आंबेमोहरचा उत्पादनखर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याचे गणित जुळत नसल्याने शेतकऱ्यांना ते परवडत नाही. परिणामी गेल्या काही वर्षांपासून त्याच्या उत्पादनात घट झाली. यंदा उत्पादन नसल्यात जमा आहे. 

आंबेमोहरच्या पडत्या काळात इंद्रायणी वाणाच्या तांदळाने बाजी मारली. कमी खर्चात अधिक उत्पादन आणि त्याचा पेंढाही चांगला होत असल्याने किफायतशीर ठरू लागला, त्यामुळे उत्पादनात वाढ होत गेली. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भाताचे उत्पादन चांगले आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
फळपिकांसह एकत्रित क्रॉपसॅप योजना...मुंबई : राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील...
‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक...मुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत...
‘वनामकृवि’ कुलगुरू पदासाठी उद्या मुलाखतीपरभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सिंचनक्षमता बळकट करून फळबागशेती केली...केळीचे मुख्य पीक, त्याचे निर्यातक्षम उत्पादन,...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांच्या ‘डिमोशन’ला...अकोला ः सन २०११ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर...
फळबाग शेती, रायपनिंग चेंबर, थेट विक्रीडोंगरकडा (जि. हिंगोली) येथील वयाच्या पासष्टीमध्ये...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...