नांदेड जिल्ह्यात दूध दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

नांदेड जिल्ह्यात दूध दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
नांदेड जिल्ह्यात दूध दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

नांदेड ः जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. १६) पहाटे दूध वाहतूक करणारी वाहने अडवून रस्त्यावर दूध ओतले. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात मदर डेअरीचे दूध संकलन बंद होते. परभणी जिल्ह्यात शासकीय दुग्ध योजने अंतर्गतचे दूध संकलन नियमित होते. दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते.

खासगी दूध संस्थांनी संकलन बंद ठेवले. रविवारी (ता. १५) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दूध संकलन करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. सोमवारी (ता. १६) निळा (ता. नांदेड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राजहंस दुधाची गाडी थांबवून चाकातील हवा सोडून दिल्यानंतर रस्त्यावर दूध ओतण्यात आले. अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांतील खासगी डेअऱ्यांचे दूध संकलन बंद होते. अर्धापूर तालुक्यातील सत्यगणपती आणि मालेगाव येथील मारुती मंदिरात दुधाचा अभिषेक करून शासनाला सुबुद्धी देण्यासाठी साकडे घालण्यात आले. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मदर डेअरीच्या जिल्ह्यातील केंद्रावरील ४० हजार लिटर दूध संकलन बंद होते. शासकीय दुग्ध योजने अंतर्गत परभणी, हिंगोली जिल्ह्यात दररोजच्या सारखे ३३ हजार लिटर दूध संकलित करण्यात आले. दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com