agriculture news in marathi, Farmers movement for tired money | Agrowon

थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचे ‘लपून बसा` आंदोलन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

चोपडा, जि. जळगाव : चोपडा साखर कारखान्याकडे असलेल्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.७) पोलिस ठाण्यात ‘लपून बसा` आंदोलन केले. पैसे न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहनाचाही इशारा त्यांनी दिला.

चोपडा, जि. जळगाव : चोपडा साखर कारखान्याकडे असलेल्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.७) पोलिस ठाण्यात ‘लपून बसा` आंदोलन केले. पैसे न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहनाचाही इशारा त्यांनी दिला.

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे २०१७-१८ या गाळप हंगामातील सुमारे चारशे शेतकऱ्यांचे चार कोटी रुपये घेणे आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी दहाला शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. नेत्यांच्या संमतीने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला. ‘शेतकरी लपवा'' आंदोलनाचा निर्णय घेऊन शहर पोलिस ठाणे गाठले. आम्हाला लपण्यासाठी कोठडी द्यावी, आमच्याकडे कुणी पैसे मागायला येणार नाही, अशी मागणी त्यांनी केली.

पोलिस उपअधीक्षक विजय चव्हाण आणि पोलिस निरीक्षक किसन  नजनपाटील यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. या वेळी पंचायत समितीचे सभापती आत्माराम म्हाळके, प्रदीप पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. या वेळी शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील, जगदीश पाटील, मुकुंद पाटील, गजानन पाटील, श्‍याम पाटील, संभाजी ब्रिगेडचे संजीव सोनवणे, प्रमोद बोरसे, भास्कर चौधरी, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र पाटील, शशिकांत निकम, रणजित निकम, अजित पाटील, अविनाश पाटील, सोपान पाटील आदी उपस्थित होते.

चोसाकाकडे सद्यःस्थितीत ७२ लाख रुपये जमा आहेत. उपलब्ध होतील तसे पैसे वाटप केले जाणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष अतुल ठाकरे यांनी दिली. कृती समितीचे सदस्य एस. बी. पाटील यांना नुकतेच दहा टन ३६३ किलोग्रॅम उसाचे पेमेंट अदा केले आहे. चोसाकाकडे १ कोटी ८२ लाख रुपये जमा झालेच नाहीत, असेही ते म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...