agriculture news in marathi, Farmers not installing micro-irrigation sets will be excluded after 31 May | Agrowon

सूक्ष्म सिंचन संच न बसविणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ मेनंतर वगळणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जानेवारी 2018

ऑनलाइन अर्जाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ
पुणे : प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत ठिबक संच न बसविल्यास यादीतून त्यांचे नाव वगळले जाणार आहे. ऑनलाइन अर्जाची मुदतदेखील १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्जाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ
पुणे : प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत ठिबक संच न बसविल्यास यादीतून त्यांचे नाव वगळले जाणार आहे. ऑनलाइन अर्जाची मुदतदेखील १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी निधीचा तुटवडा नसल्याने ऑनलाइन अर्जाचा कालावधी वाढविण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य शासनाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. "ठिबकसाठी चालू वर्षात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ५५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना सरसकट ४५ टक्के अनुदान मिळणार आहे. मूळ योजनेनुसार अर्जाची मुदत नोव्हेंबरमध्येच समाप्त झाली होती. मात्र, आता १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास शासनाने मान्यता दिली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

राज्याचे कृषी उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी फलोत्पादन संचालक प्रल्हादराव पोकळे यांना पाठविलेल्या पत्रानुसार पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांना पुढील पाच महिन्यांच्या आत ठिबक संच बसविणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे." ई-ठिबक प्रणालीवर २०१७-१८ मधील ऑनलाइन कामकाजाकरिता अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आलेली असली तरी १५ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांना कृषी अधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंतच पूर्वसंमती द्यावी. त्यानंतरची शेतकऱ्यांची यादी २०१८-१९ मधील कामकाजात टाकली जाणार आहे. मात्र, या शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत संच घ्यावे लागतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

"कृषी अधिकाऱ्यांनी पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांनी मुदतीत ठिबक संचाची उभारणी न केल्यास अशा शेतकऱ्यांची नावे २०१८-१९ मधील कामकाजातून वगळली जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी संचाची कामे नियोजनानुसार वेळेत करणे क्रमप्राप्त आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...