agriculture news in marathi, farmers not paying electricity pump bills will face connectivity loss says minister | Agrowon

बिले न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार : बावनकुळे
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 डिसेंबर 2017

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर वीजच्या रकमेची थकबाकी आहे. मात्र काही वीज बीलांच्या रकमेत तांत्रिक कारणामुळे अवाच्या सव्वा वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३ ते ५ हजार रूपये भरावे असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले असून जे शेतकरी सांगितलेली रक्कमही भरणार नाहीत. त्यांना वीज पुरवठा करणारे रोहीत यंत्र आणि वीज जोडणी तोडण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर वीजच्या रकमेची थकबाकी आहे. मात्र काही वीज बीलांच्या रकमेत तांत्रिक कारणामुळे अवाच्या सव्वा वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३ ते ५ हजार रूपये भरावे असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले असून जे शेतकरी सांगितलेली रक्कमही भरणार नाहीत. त्यांना वीज पुरवठा करणारे रोहीत यंत्र आणि वीज जोडणी तोडण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

ऊर्जामंत्र्यांच्या या घोषणेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी शेतकऱ्यांची वीज पुरवठा तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असल्याच्या घोषणा देत सभात्याग केला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान धुळे जिल्ह्यातील कापडमे उपकेंद्रातील रोहीत्र यंत्र बंद करण्याचा घेतलेला निर्णयाचा मुद्दा काँग्रेसचे कुणाल पाटील यांनी उपस्थित केला. त्यास उत्तर देताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी वरील घोषणा केली.

शेतकऱ्यांकडे जवळपास २० हजार कोटी रूपयांची थकबाकी आहे. मात्र थकबाकीची सर्वच रक्कम भरण्यापेक्षा अवघे ३ किंवा ५ हजार रूपये भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे. तसेच जे शेतकरी वीज बील भरणार नाहीत त्यांचा वीज पुरवठा नोटीस दिल्यानंतर तोडण्यात येणार असल्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

यावर सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सर्वपक्षिय सदस्यांनी उपप्रश्न विचारत शेतकऱ्यांच्या वीज जोडणी तोडण्यापूर्वी त्यांना काही सवलत द्यावी अशी मागणी केली.
यावेळी अजित पवार यांनीही याबाबत उपप्रश्न उपस्थित करत म्हणाले की, शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणाऱ्या रोहीत्र यंत्र संच बंद करण्याऐवजी एखाद्या भागातील १० पैकी ५ शेतकऱ्यांनी वीज बीलाची भरणा केल्यास ते यंत्र बंद करून नये. तसे केल्यास वीज बील न भरणारे शेतकरी आणि भरणारे शेतकऱ्यांवर अन्याय केल्यासारखे होईल. त्यामुळे वीज पुरवठा करणारे यंत्र बंद करू नये अशी मागणी केली.

त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोणत्याही शेतकऱ्याची वीज जोडणी ही त्याला नोटीस दिल्यानंतरच तोडली जाते. जर शेतकऱ्यांनी वीज बील भरले नाहीच. तर त्याची वीज जोडणी तोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत तुम्ही ही मंत्री होतात. तुम्हालाही याची कल्पना असल्याचे अजित पवार यांना सांगितले. ऊर्जामंत्र्याच्या या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सरकार विरोधी घोषणा देत सभात्याग केला.

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...