agriculture news in Marathi, farmers not selling agri products in procurement centers, Maharashtra | Agrowon

हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

औसा, जि. लातूर ः तालुक्‍यात शासनाच्या कृषी व पणन मंडळाच्या सहकार्याने सुरू झालेल्या हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, खरिपाचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची २४ दिवसांत केवळ २ हजार ८२ क्विंटलची खरेदी झाली आहे. याउलट बाजारपेठेतील आवक मात्र गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट होण्याच्या मार्गावर आहे.

औसा, जि. लातूर ः तालुक्‍यात शासनाच्या कृषी व पणन मंडळाच्या सहकार्याने सुरू झालेल्या हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, खरिपाचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची २४ दिवसांत केवळ २ हजार ८२ क्विंटलची खरेदी झाली आहे. याउलट बाजारपेठेतील आवक मात्र गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट होण्याच्या मार्गावर आहे.

गेल्यावर्षी पावसामुळे सोयाबीनचे बम्पर उत्पादन होऊनही ते काळे पडल्याने अतिशय कमी भावात विक्री करावी लागली. यंदाही कमी भावामुळे शेतकरी भरडला जात असल्याने मागणीप्रमाणे उशिरा का होईना शासनाचे हमीभाव केंद्र २४ नोव्हेंबरपासून सुरू झाले; परंतु २४ दिवस उलटूनही शेतकऱ्यांचा ओढा या केंद्राकडे दिसत नाही.

यात एक तर हे केंद्र खूप उशिराने सुरू झाले. त्यामुळे अडचणीतल्या शेतकऱ्यांनी बाजारपेठेत उडीद-मुगासारखेच मिळेल त्या भावात सोयाबीचीही विक्री करून अडचण भागविली; तसेच शासनाने आयात तेलावरील टॅक्‍स वाढविल्याने खुल्या मार्केटमध्ये सोयाबीनचे भाव वाढले.

ज्यांच्याकडे सोयाबीन शिल्लक आहे अशा काही मोठ्या शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढतील या आशेवर आपला माल बाजारपेठेत आणला नाही. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारातील आजचा सोयाबीनचा लिलाव झालेला भाव २ हजार ८५४ ते २ हजार ९२१ आहे. शिवाय आजमितीला गतवर्षी ९६ हजार ४१८ क्विंटल असणारी आवक यावर्षी दीड पटीहून अधिक १ लाख ५४ हजार ७५५ क्विंटल झाली आहे. तर बाजूलाच असलेल्या औसा तालुका खरेदी-विक्री संघाच्या हमीभाव केंद्रात सोयाबीनची २ हजार ८२ खरेदी, उडीद २ हजार ८५८ क्विंटल व मुगाची खरेदी ४७४ क्विंटल झाली आहे.

यावरून ऑनलाइन खरेदीच्या कागदपत्रांची पूर्तता, मालाच्या ग्रेडची झंझट हे सर्व व्यापारीवर्ग करू शकतात तसे शेतकऱ्यांना जमत नसल्याने त्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.

इतर बातम्या
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
सोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
आटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
कामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर  : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...