शेतकऱ्यांचा साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या

नगर : विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. १६) साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. (छायाचित्र : सूर्यकांत नेटके)
नगर : विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. १६) साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. (छायाचित्र : सूर्यकांत नेटके)

नगर : उसाला साडेतीन हजार रुपयांचा प्रतिटन दर द्यावा यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १६) शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर सहसंचालक कार्यालयात चार तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

दरासह अन्य शेती शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटनेचे आंदोलन पेटले आहे. शेवगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्यानंतर रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर सहसंचालक कार्यालयांमध्ये चार तास आंदोलन केले.

उसाला प्रति टन चार हजार रुपयांचा दर द्यावा, साखर कारखान्यांकडून वजन काट्यावर होणारी लूट थांबवावी, ७०-३० या सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, शेवगाव तालुक्यातमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी यावेळी केली.

शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, बाळासाहेब पटारे अजय महाराज बारसकर, बच्चू मोढवे, बन्सी सातपुते, सुभाष लांडे यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com