Agriculture News in Marathi, Farmers organization agitation, solapur district | Agrowon

सहकारमंत्र्यांच्या घरासमोर प्रहारचे कार्यकर्ते- पोलिसांत झटापट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

सोलापूर ः ऊसदराच्या प्रश्‍नाकडे गांधीगिरी करत लक्ष वेधण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर मोबाईल व्हॅनमध्ये रक्तदान शिबिर घेणाऱ्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शुक्रवारी (ता.१७) चांगलीच झटापट झाली.

आक्रमक झालेले कार्यकर्ते आणि पोलिसांवर सुररू असलेल्या प्रश्‍नांच्या भडीमाराने वातावरण चांगलेच तापले. त्यातच संपर्क प्रमुख अतुल खुपसे पाटील हे रक्तदान सुरूच ठेवून मोबाईल व्हॅनबाहेर आले आणि रक्तदान करत असलेली त्यांची बॅग अंगावर फुटल्याने पुन्हा गोंधळाला सुरवात झाली.

सोलापूर ः ऊसदराच्या प्रश्‍नाकडे गांधीगिरी करत लक्ष वेधण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर मोबाईल व्हॅनमध्ये रक्तदान शिबिर घेणाऱ्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शुक्रवारी (ता.१७) चांगलीच झटापट झाली.

आक्रमक झालेले कार्यकर्ते आणि पोलिसांवर सुररू असलेल्या प्रश्‍नांच्या भडीमाराने वातावरण चांगलेच तापले. त्यातच संपर्क प्रमुख अतुल खुपसे पाटील हे रक्तदान सुरूच ठेवून मोबाईल व्हॅनबाहेर आले आणि रक्तदान करत असलेली त्यांची बॅग अंगावर फुटल्याने पुन्हा गोंधळाला सुरवात झाली.

सुमारे पाऊणतास चाललेल्या या गोंधळानंतर कार्यकर्त्यांची समजूत काढून पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.ऊस दराच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी वेळकाढूपणा होत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, या आंदोलनात उडी घेतली आहे.

दोनच दिवसांपूर्वी खुपसे पाटील यांनी होटगी रस्त्यावरील सहकारमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर भरवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, शुक्रवारसकाळपासूचन मंत्र्यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आला होता. पण त्यातूनही चकवा देत दुपारी दोनच्या सुमारास मोबाईल व्हॅनमध्ये प्रहारचे शंभराहून अधिक कार्यकर्ते मंत्र्यांच्या घरासमोर पोचलेच. जोरदार घोषणाबाजी करत, सरकारचा निषेध करत रक्तदान शिबिर सुरू केले.

तेव्हा पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. व्हॅनमध्ये स्वतः खुपसे पाटील रक्तदान करत होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखले आणि बाहेर आणले. तेव्हा प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. मंत्र्यांचा निषेधही झाला. त्यातच रक्तदान होत असलेली बॅग त्यांच्या अंगावर फुटल्याने गोंधळात आणखीनच भर पडली. त्यानंतर काही काळ पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक धुमश्‍चक्रीने वाद वाढतच गेला. पण पोलिसांनी समजूतीने घेत कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना ताब्यात घेतले आणि विजापूर नाका पोलिस स्टेशनला नेले. त्यानंतर वातावरण निवळले.

‘स्वाभिमानी'चा पंढरपुरात रास्ता-रोको,
आंदोलकांनी एसटीही फोडली

पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी पुणे-पंढरपूर मार्गावर बाजीराव विहिरीजवळ रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

या वेळी श्री. तुपकर यांनी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार प्रहार केला. ऊस दरावर तातडीने तोडगा काढा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, गुरुवारी रात्री जत डेपोच्या बसच्या काचा अज्ञात लोकांनी फोडल्या. तर शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कराड-उस्मानाबाद बस (क्रमांक-एमएच-१४ बीटी ३७१७) कोर्टी येथे अडवून तोडफोड करण्यात आली.

लोकमंगल कारखान्यासमोर बेमुदत धरणे
बळिराजा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवार (ता.१७) पासून दक्षिण सोलापुरातील भंडारकवठेतील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल कारखान्यासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरवात केली.

या वेळी बळिराजाचे अध्यक्ष संजय पाटील घाटणेकर, माउली हळणवर, महामूद पटेल, उमाशंकर पाटील आदी उपस्थित होते. त्याशिवाय बीबीदारफळ येथील लोकमंगल कारखान्यासमोर जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांचेही उपोषण सुरूच आहे.

शेतकरी संघटनेचा बार्शीत रास्ता-रोको
रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटनेने बार्शी-कुर्डुवाडी रोडवर शेंद्री फाट्यावर प्रदेश युवाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी अकरा वाजता रास्ता-रोको आंदोलन केले. उसाला प्रतिटन तीन हजार रुपये द्यावेत, वीजबिल वसुली व वीजपुरवठा खंडित करणे थांबवा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

सहकारमंत्री मुके आणि खलनायक
प्रहार संघटनेचे संपर्कप्रमुख अतुल खुपसे पाटील आंदोलनावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "सहकारमंत्री कमी बोलतात नव्हे, ते मुके आहेत. शेतकऱ्यांच्या हितापेक्षा त्यांना कारखानदारांचे हित जास्त महत्त्वाचे वाटते. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. आम्ही आमचं रक्त सांडतो आहोत, पण त्यांना पाझर फुटत नाही. ते या सगळ्या प्रकाराला जबाबदार असणारे खलनायक आहेत.''
 

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...