सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी रोखले

सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी रोखले
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी रोखले

सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर वडकबाळनजीक ब्रिजकम बंधारा बांधण्याचे आश्वासन देऊनही बंधारा टाळून फक्त पूल बांधण्यात येत आहे. हे लक्षात आल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्याचे हे काम रविवारी (ता.१६) रोखले. आश्वासनानुसार कार्यवाही न होईपर्यंत काम सुरू न करू देण्याची शेतकऱ्यांनी घेतली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अप्पासाहेब कोरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केले. वडकबाळ गावाजवळ सीना नदीवर पूल बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना नदीवरील पुलासोबत ब्रिजकम बंधारे या योजनेंतर्गत बांधण्यात येतील, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी विजापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे उद्‍घाटन केले. त्या वेळी सीना आणि भीमा नदीवर पुलाच्या खाली बंधारे बांधण्याची घोषणा केली होती. या बंधाऱ्यांमुळे शेतीला मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे. 

वडकबाळच्या सीना नदीवर प्रत्यक्षात पुलाचे बांधकाम सुरू झाल्यावर बंधारे नव्हते. फक्त पूल बांधण्यात येत आहे, असे परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सीना नदीवरील पुलाचे बांधकाम बंद पाडले. सरकारला जर बंधारे बांधायचेच नव्हते, तर आश्वासने कशाला दिली? बंधारे होणार असतील, तर पुलाचे काम का सुरू करण्यात आले, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. याबाबत अधिकाऱ्यांनाही फारशी माहिती नसल्याचे सांगण्यात आले. पण तूर्तास तरी काम बंद पडले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com