agriculture news in marathi, farmers problem ignor in Zilla Parishad | Agrowon

सोलापूर जिल्हा परिषदेत शेतीचे प्रश्‍न वाऱ्यावर
सुदर्शन सुतार
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

सोलापूर : पावसाच्या बेभरवशामुळे काही भागांत अडचणीत आलेले शेतकरी, तर अतिवृष्टीमुळे अन्य भागांत वाया गेलेल्या रब्बी पेरण्या, राज्यात कीडनाशकांच्या फवारणीमुळे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्‍न, या पार्श्‍वभूमीवर आपल्याकडील उपाययोजना काय आणि कशा करावयाच्या, यांसारख्या अनेक प्रश्‍नांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होऊ शकली असती; पण या सर्वसाधारण सभेत यापैकी एकाही प्रश्‍नावर, एकाही सदस्याने प्रश्‍न विचारला नाही, अक्षरक्षः शेतीचे प्रश्‍न सदस्यांनी थेट वाऱ्यावर सोडले.

सोलापूर : पावसाच्या बेभरवशामुळे काही भागांत अडचणीत आलेले शेतकरी, तर अतिवृष्टीमुळे अन्य भागांत वाया गेलेल्या रब्बी पेरण्या, राज्यात कीडनाशकांच्या फवारणीमुळे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्‍न, या पार्श्‍वभूमीवर आपल्याकडील उपाययोजना काय आणि कशा करावयाच्या, यांसारख्या अनेक प्रश्‍नांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होऊ शकली असती; पण या सर्वसाधारण सभेत यापैकी एकाही प्रश्‍नावर, एकाही सदस्याने प्रश्‍न विचारला नाही, अक्षरक्षः शेतीचे प्रश्‍न सदस्यांनी थेट वाऱ्यावर सोडले.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १२) झाली. सर्व विषय समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड आदी उपस्थित होते. विषयपत्रिकेवर केवळ एक विषय आणि आयत्या वेळच्या विषयांमध्ये तब्बल २२ विषय होते.

त्यामुळे हवी तशी चर्चा आणि ठराव होऊ शकले नाहीत. केवळ आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्‍नावर चर्चा होताना, पदाधिकारी व सदस्यांनी थेट प्रशासनाला विविध मुद्द्यावर धारेवर धरल्याचे चित्र होते.
यंदा खरिपाच्या पेरण्या जेमतेम झाल्या, त्यात पावसाअभावी हाती काहीच लागले नाही, रब्बीच्या पेरण्या मंगळवेढा, मोहोळ, बार्शी यापैकी बहुतेक भागांत झाल्या आहेत. पण पुन्हा पावसामुळे काही ठिकाणी वाया गेल्या, तर काही ठिकाणी पेरण्या पुढे गेल्या.

पण यावर कोणतीच चर्चा झाली नाही, शिवाय कर्जमाफी योजना आणि राज्यातील कीडनाशकाच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबतही कोणी प्रश्‍न विचारला नाही. त्यामुळे शेती प्रश्‍नावर कोणालाही स्वारस्य नसल्याचे दिसून आले.

आरोग्याच्या प्रश्‍नावर जोरदार चर्चा झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आहेत. मात्र, त्या ठिकाणी डॉक्‍टर नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचा मुद्दा सुभाष माने, रेखा भूमकर, सचिन देशमुख, शैला गोडसे, भारत शिंदे, शीतलदेवी मोहिते-पाटील, रेखा राऊत, त्रिभुवन धाईंजे, मदन दराडे, नीलकंठ देशमुख, साक्षी सोरटे, ज्योती पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित केले.

या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी हस्तक्षेप करत याबाबत आरोग्य विभागाने काय नियोजन केले आहे. त्याचे स्पष्टीकरण सभागृहात दिले. सुभाष माने यांनी तुंगत (ता. पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर त्या ठिकाणी नोकरीला नसतानाही पगार मात्र त्या ठिकाणहून काढला जातो, हे सभागृहात निदर्शनास आणून दिले. त्या वेळी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन डॉ. भारुड
यांनी दिले.

 

इतर बातम्या
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
अमरावती विभागात शुल्क गोळा करूनही...अमरावती : शिपाई आणि रोपमळा मदतनीस पदाकरिता...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
जात प्रमाणपत्र पडताळणीतील बनवेगिरी कायमपुणे : बोगस जात प्रमाणपत्रे शोधण्यासाठी नियुक्त...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
तुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणारपुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र,...
कृषी योजनांचा निधी खर्च करण्यात अपयशपुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी...
शेतकरी आत्महत्यांचे सरकारला काहीच वाटत...राळेगणसिद्धी, जि. नगर : ‘‘लोकपाल आणि लोकायुक्त...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...