agriculture news in marathi, Farmers producer compainies to get benefit in government procurement scheme | Agrowon

शेतकरी कंपन्यांना शेतमाल खरेदी प्रक्रियेत संधी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

अकोला : केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर राज्यात तेलबिया, कडधान्याची हमीभावाने खरेदी केली जाते. राज्य सहकारी पणन महासंघामार्फत ही खरेदी प्रक्रिया राबवली जात असून खरेदी केंद्रावर एफएक्‍यु दर्जाचा शेतमाल उपलब्ध व्हावा, यासाठी आता शेतकरी कंपन्यांना या खरेदी प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. मात्र असे करताना शासनाने शेतकरी कंपन्यांनी सभासदांचा शेतमाल बांधावरच स्वच्छ करून प्रतवारी करण्याचे सूचवित यासाठीचे सेवा शुल्क शेतकऱ्याकडून वसूल करून शेतकरी कंपन्यांना दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अकोला : केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर राज्यात तेलबिया, कडधान्याची हमीभावाने खरेदी केली जाते. राज्य सहकारी पणन महासंघामार्फत ही खरेदी प्रक्रिया राबवली जात असून खरेदी केंद्रावर एफएक्‍यु दर्जाचा शेतमाल उपलब्ध व्हावा, यासाठी आता शेतकरी कंपन्यांना या खरेदी प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. मात्र असे करताना शासनाने शेतकरी कंपन्यांनी सभासदांचा शेतमाल बांधावरच स्वच्छ करून प्रतवारी करण्याचे सूचवित यासाठीचे सेवा शुल्क शेतकऱ्याकडून वसूल करून शेतकरी कंपन्यांना दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात सोमवारी (ता.१२) शासनाने निर्णय जाहीर करीत परिपत्रक काढले. शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी)नी त्यांच्या भागधारक असलेल्या सभासद शेतकऱ्यांचा शेतमाल बांधावरच स्वच्छ (क्‍निनिंग) व प्रतवारी (ग्रेडींग) करून एफएक्‍यु दर्जाचा शेतमाल एकत्रितपणे खरेदी केंद्रावर आणावा. यामुळे शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे वाहतुकीची व्यवस्था करण्याची गरज राहणार नाही. शिवाय खरेदी केंद्रावर एफएक्‍यु दर्जाचा शेतमाल आल्याने केंद्रावर खरेदीची क्षमता वाढेल. यासाठी शेतकरी कंपन्यांनी त्यांच्या भागधारकांची प्रमाणीत यादी खरेदी केंद्रावर सादर करावी. तसेच सभासदांची शासनाच्या एनईएमएल या पोर्टलवर नोंदणी करावी.

शेतमालाची स्वच्छता व प्रतवारीसाठी लागणाऱ्या शुल्कासोबतच केंद्रापर्यंत माल आणण्याचा वाहतूक खर्च निश्‍चित करावा. शेतकऱ्याने शेतमाल विक्री केल्यानंतर त्याला मिळणाऱ्या पैशांमधून या सेवेसाठी लागणाऱ्या शुल्काची रक्कम वसूल केली जाईल. शेतकरी कंपनीला सुपूर्द केली जाईल. 

आज घेणार सचिवांची भेट
शासनाने घेतलेल्या निर्णयाचे शेतकरी कंपन्यांनी स्वागत केले आहे. यामुळे खरेदी प्रक्रियेसाठी प्रवेशद्वार उघडल्याचे सांगितले जाते. तरी काही मुद्यांवर साशंकता आहे. याअनुषंगाने बुधवारी (ता.१४) संबंधित सचिव व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकरी कंपन्यांना असलेल्या शंकाबाबत चर्चा केली जाईल. बांधावर क्‍लिनिंग, ग्रेडिंगसाठीचा मोबदला, वाहतुकीचे अंतर जास्त असल्यास होणारा खर्च, शेतकरी कंपनीच्या ठिकाणीच ग्रेडरकडून शेतमालाची तपासणी करणे आदी प्रश्‍नांबाबत चर्चा केली जाणार असल्याचे शेतकरी कंपनीकडून सांगण्यात आले.

शासनाच्या अध्यादेशाबाबत आजच आैरंगाबाद येथे शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक झाली. मात्र या अध्यादेशात कंपन्याची भूमिका आणि जबाबदारीबाबत स्पष्टता नसल्याने आम्ही संभ्रमात आहाेत.
- याेगेश थाेरात, व्यवस्थापकीय संचालक महाएफपीसी
 

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...