शेतकरी कंपन्यांची उलाढाल २६ कोटींपर्यंत

शेतकरी कंपनी
शेतकरी कंपनी

पुणे ः महाराष्‍ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी ९९ कंपन्यांचे काम प्रत्यक्ष सुरू झाले असून, या कंपन्यांची उलाढाल २६ काेटींपर्यंत पाेचली आहे. शेतीमालाच्या उत्पादकतेमध्ये वाढ करणे, शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढविणे आणि शेतकऱ्यांना पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून देणे यासाठी जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ४०९ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून, ९९ कंपन्यांचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. या कंपन्यांनी बाजारपेठेमध्ये विविध शेतीमालाची विक्री करत २६ काेटींची उलाढाल केली आहे.  शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी १८ लाखांचा व्यवसाय विकास आराखडा प्रकल्पांतर्गत तयार केला जाताे. या आराखड्याला ७५ टक्के अनुदान प्रकल्पातून देण्यात येते. तर २५ टक्के हिस्सा कंपनीचा असताे. तर कंपनी व्यवस्थापकाला प्रकल्पाच्या माध्यमातून प्रति महिना पाच हजार रुपयांचे वेतन एका वर्षासाठी दिले जाते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com