agriculture news in marathi, farmers producers company will implement commodity mortgage scheme, kolhapur, maharashtra | Agrowon

शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक कंपन्यांचाही सहभाग
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

पणन मंडळाने अतिशय चांगला निर्णय घेतलेला असून, चार ते पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या योजनेअंतर्गत मुगाचे संकलनही सुरू केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुलभ आहे. व्याजदरही सहा टक्के एवढा आहे. सध्या या योजनेत सहभागी असलेल्या कंपन्यांचे अनुभव पाहून ही योजना आणखी व्यापक स्तरावर राबवली जाईल, असा विश्वास वाटतो.
- योगेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक,  महाराष्ट्र फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी (महाएफपीसी)
 

कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार समित्यांबरोबरच आता शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फतही (एफपीसी) राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजाणीत बाजार समित्यांची कामगिरी असमाधानकारक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पणन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या कंपन्यांना पणन मंडळाच्या वतीने कर्जपुरवठा करण्याचे नियोजन आहे.

शेतीमालाचे भाव बाजारात पडले तर कमी किमतीत शेतीमाल विकून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी राज्यात शेतीमाल तारण योजना राबवली जाते. त्यानुसार शेतीमाल गोदामांत तारण ठेऊन त्यावर शेतकऱ्यांना शेतीमालाच्या किमतीच्या ७५ टक्के कर्ज दिले जाते. शेतीमालाचे दर सुधारल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारात हा माल विकणे अभिप्रेत असते. सध्या ही योजना बाजार समित्यांमार्फत राबविण्याचे धोरण आहे. परंतु अपवाद वगळता बाजार समित्यांनी ही योजना राबविण्यास उदासीनता दाखविल्याने या योजनेचा हेतू असफल होताना दिसत आहे. ही योजना न राबविणाऱ्या बाजार समित्या बरखास्त करण्याचे आदेशही पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी नुकतेच दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर पणन मंडळाने शेतकरी उत्पादक कंपन्यांना या योजनेत सामावून घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार काही कंपन्यांनी कामही सुरू केले आहे. राज्यात कृषी व्यवस्थापन तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) माध्यमातून सुमारे १३४६ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. प्रत्येक कंपनीशी सरासरी ४०० शेतकरी जोडले गेले आहेत.

आत्मा व कृषी विभागातील अंतर्गत संघर्षामुळे  सध्या या कंपन्यांकडे कोणाचेच फारसे लक्ष नाही. या कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे भांडवल गुंतले आहे. तसेच अनेक कंपन्या निष्क्रिय असून, त्यांचे अस्तित्व कागदावरच आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना नवी संधी निर्माण झाली आहे, असे मत सूत्रांनी व्यक्त केले.  

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळू शकेल. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तातडीने कृषी पणन मंडळाची संपर्क साधून ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी सांगितले.

अशी असेल कार्यपद्धती
शेतकरी उत्पादक कंपन्या बाजारभावानुसार शेतकऱ्यांकडून शेतीमाल घेतील. कंपन्यांकडून शेतीमालाच्या बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना कर्जरूपात देण्यात येईल. शेतीमालाचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा (हमीभाव) वर गेल्यास शेतकरी शेतीमाल विकू शकतील. विक्री केलेल्या रकमेतून कर्ज, व्याजाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम संबधित शेतकऱ्यांच्या नावावर जमा होईल.

या आहेत अटी

  • शेतकरी कंपनी दोन वर्षांपूर्वी रजिस्टर असावी.
  • कंपनीकडे स्वमालकीचे गोदाम असावे.
  •  गोदाम असणाऱ्या कंपनीने कृषी पणन मंडळाची पूर्वमंजुरी व तारण मर्यादा मंजूर करून घेणे आवश्‍यक.
  • शेतीमाल तारण योजना निधी हा बाजारनिधी असल्याने कंपन्यांना ६ टक्के व्याजदर आकारण्यात येणार.
  • एका शेतकरी उत्पादक कंपनीस जास्तीत जास्त २५ लाख रुपये तारण कर्ज मिळू शकेल.
  • बाजार समित्यांसाठी असणाऱ्या सर्व तरतुदी शेतकरी उत्पादक कंपन्याला लागू होतील.

 

इतर ताज्या घडामोडी
मांजरीत शेवंती दिनास प्रारंभ; १५०...पुणे : पुष्प संशोधन संचालनालयाच्या वतीने आज...
राजस्थानमध्ये सध्याचा कौल काँग्रेसच्या...जयपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान...
तेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे...हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (...
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवररायपूर : छत्तीसगडमध्ये चेहरा नसतानाही काँग्रेसने...
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये...भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान...
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...
धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपला मोठे यशधुळे : धुळे महापालिकेत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर...
खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा...जळगाव : खानदेशात सहकारी संघ आणि खाजगी डेअऱ्या...
कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणीधुळे : कांद्याची लागवड खानदेशात वाढत आहे....
सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दरसोलापूर : शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
कोल्हापुरात दूधदरात कपात नाहीकोल्हापूर : सध्या अनुदानाच्या मुद्द्यावरून...
परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे...परभणी ः दुष्काळी परिस्थिती तसेच शासकीय दूध...
सरकारला कृषी धोरणावरच बोलायला लावू ः...शिर्डी, जि. नगर : देश आणि राज्यातील शेतकरी अडचणीत...
धुळे जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वितरण...जळगाव  ः खानदेशात खरिपात जसे बॅंकांनी...
सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात...सांगली ः जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे ३५ दूध...
‘महाएफपीसी’ करणार ५ हजार टन कांदा संकलनपुणे  ः कमी झालेल्या कांदा स्थिरता...
पुणे विभागात पाण्याअभावी ज्वारीचे पीक...पुणे   ः कमी पावसामुळे रब्बी ज्वारीला...
राज्य सेवा आयोगाकडून ३४२ पदांच्या...मुंबई : राज्य सेवा आयोगाकडून शासनाच्या विविध...
वऱ्हाड खासगी डेअरींकडून दूध दरकपातीची...अकोला   ः उत्पादनवाढीचे कारण देत खासगी दूध...