agriculture news in marathi, Farmers protest against land acquisition | Agrowon

जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

सर्व शेतकरी बहुसंख्येने अल्पभूधारक आहेत. या प्रकल्पात जमिनी दिल्या तर ४० टक्के शेतकरी भूमिहीन होतील. त्यामुळे शासनाने अलाईनमेंट बदलावी. जुनी अलाईनमेंट कायम करावी. यामुळे शासनाचा पैसे वाचेल व शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.
- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

नाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या वतीने रेल्वे सर्वेक्षण काम नाशिक जिल्ह्यातील नानेगाव येथे सुरू आहे. यास विरोध दर्शविण्यासाठी नानेगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन.बी यांना लेखी निवेदन दिले.

नानेगाव शिवरातून ही मोजणी होत असताना ग्रामस्थांनी या मोजणीच्या कामात हस्तक्षेप केला होता. या प्रकल्पामुळे गावातील एकूण क्षेत्रापैकी ३० टक्के क्षेत्र हे रेल्वे मार्गात जाण्याची भीती ग्रामस्थांना आहे. यामुळे गाव दोन ठिकाणी विभागेल व संपूर्ण बागायती क्षेत्र जाण्याची शक्यता आहे. गावची लोकसंख्या ४५०० च्या जवळपास आहे. त्यात रोजगाराचे साधन शेती असल्यामुळे भूमिहीन व बेरोजगार होण्याच्या भीतीने सर्व चिंतेत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी खा.हेमंत गोडसे यांच्यासह राधाकृष्णन. बी यांच्यासममोर मार्गाला विरोध केला.

द्राक्ष व इतर फळबागा असलेले हे क्षेत्र आहे. संपूर्ण गाव शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे अन्याय करू नका, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

नाशिक रोड, शिंदे, मोहदरी, सिन्नर, पुणे असे सर्वेक्षण झाले. दुसऱ्या मार्गाचे सर्वेक्षण नाशिक रोड, एकलहरे, जाखोरी, सिन्नर यामागे झाले असल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले.

नाशिक रोड ते इंडिया बुल्स (सिन्नर) चे पर्यायी रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गाऐवजी उपलब्ध रेल्वे मार्गाबाबत विचार करावा. नवीन नाशिकरोड, बेलतगव्हान, संसरी, शेवगे दारणा, नानेगाव, वडगाव, सिन्नर या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण बंद करावे, अशी मागणीही करण्यात आली. 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...