agriculture news in marathi, Farmers protest on oniion issue at Kalwan, nashik, Maharashtra | Agrowon

कांदादर प्रश्नी शेतकऱ्यांचे कळवणला ‘रास्ता रोको’
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

कळवण, जि. नाशिक : केंद्र सरकाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी (ता.२७) कळवण बस स्थानकासमोर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

कळवण, जि. नाशिक : केंद्र सरकाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी (ता.२७) कळवण बस स्थानकासमोर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

शुक्रवारी (ता.२७) सकाळी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध केला. चार वर्षांपासून दुष्काळ व सततच्या नापिकीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चालू वर्षी कमी कांदे असून, थोडेफार भाव मिळू लागले होते, मात्र गुरुवारी ३००० ते ३५०० रुपये विकला जाणारा कांदा शासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत व्यापारी वर्गावर दबाव आणून कांदा बाजारभाव पाडण्याचा प्रयत्‍न करण्यात आला. या वेळी कांदा उत्‍पादकांकडून जोरदार टीकाही करण्यात आली.

कळवण तालुक्यातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून, तात्काळ खड्डे बुजविण्याचे काम शासनाने हात घेण्याची मागणीही या वेळी करण्यात आली; तसेच महावितरण कंपनीने वसुली थांबवावी, अशी मागणी आंदोलनप्रसंगी करण्यात आली.

या वेळी तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, कौतिक पगार, रवींद्र देवरे, धनंजय पवार, राजेंद्र भामरे, महेंद्र हिरे, शैलेश पवार, प्रदीप पगार, टिनू पगार, अमोल पगार, प्रवीण रौंदळ, अमित देवरे, दीपक वाघ, जितेंद्र वाघ, संभाजी पवार, सुनील पगार, विनोद मालपुरे, रत्नाकर गांगुर्डे, संजय रौंदळ, बंडू पगार, ललित आहेर, पप्पू पवार, रामा पाटील, पंकज पाचपिंडे आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
बारामतीतील विकासाचे काम देशातील...बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य...
मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीनेऔरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी...
‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र...परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या...
रताळ्याच्या पिठापासून ‘अ’...टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी...
पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत...
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेनाअकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या...
‘एकात्मिक व्यवस्थापनातून एकरी १०० टन ऊस...आळेफाटा, जि. पुणे : मातीपरीक्षणानुसार खतांचा...
फुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर...पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे...नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर...
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी...मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात...
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन...पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या...
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान...पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून,...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार...सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने...
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ...सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक...
नगर जिल्ह्यात बियाण्यांची अवघी दहा...नगर ः खरिपासाठी जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांची...
सांगली जिल्हा बॅंकेकडून २९८ कोटींचे...सांगली : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असताना...
तूर नोंदणीपासून वंचित ठेवल्याचा खुलासा...नगर : शेवगाव बाजार समितीअंतर्गत सुरू...
कोल्हापूर जिल्ह्याचा ३६५ कोटींचा योजना...कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या...
कुपोषण मुक्तीसाठी शेतकऱ्याने शेवगा...नाशिक  : कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास आपलाही...