agriculture news in marathi, farmers from Pune districts agitate on various issues | Agrowon

पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केले जेल भरो आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 मे 2018

पुणे : कर्जमुक्ती, दुधासंदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे, वीजबिलमुक्ती आणि शेतीमालाला उत्पादन खर्च व पन्नास टक्के नफा यांचे सरकारने दिलेले आश्वासन पाळणे नाही, म्हणून शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने सोमवारी (ता. १४) जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, शिरूर, खेड आणि जुन्नर या ठिकाणी जेल भरो आंदोलन केले आहे. 

पुणे : कर्जमुक्ती, दुधासंदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे, वीजबिलमुक्ती आणि शेतीमालाला उत्पादन खर्च व पन्नास टक्के नफा यांचे सरकारने दिलेले आश्वासन पाळणे नाही, म्हणून शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने सोमवारी (ता. १४) जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, शिरूर, खेड आणि जुन्नर या ठिकाणी जेल भरो आंदोलन केले आहे. 

इंदापूरमध्ये शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते, हरिदास पवार, सचिन देशमाने, मंगेश घाडगे, दौडमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, शिरूर बाळासाहेब घाडगे, खेड शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष वस्ताद दौंडकर, जुन्नर लक्ष्मणराव शिंदे, संजय भुजबळ यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणच्या पोलिस स्टेशनच्या आवारात जेल भरो आंदोलन करण्यात आले.  

शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते म्हणाले, ``गेल्या वर्षी एक जून रोजी झालेल्या शेतकरी संपाच्या अनुषंघाने राज्य सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दहा कर्जमाफी, वीजबिलमाफी आणि शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर गाईच्या दुधाला २४ रुपयांएेवजी २७ रुपये दर देण्यात येईल याबाबतचा शासन निर्णय १९ जून २०१७ काढण्यात आला होता. या आदेशाची अंमलबजावणी दहा जुलै २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे घेण्यात येईल. यामध्ये शासन निर्णय न पाळणाऱ्या दूध संस्थावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ प्रमाणे कारवाई होणे अभिप्रेत होते. झालेला निर्णय एक वर्ष उलटूनदेखील सत्ताधारी व विरोधक मूग गिळून गप्प आहे.’’

इतर ताज्या घडामोडी
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...