शेतकऱ्याचा रोष पाहून सदाभाऊ खोत बसले गप्प !

शेतकऱ्याचा रोष पाहून सदाभाऊ खोत बसले गप्प!
शेतकऱ्याचा रोष पाहून सदाभाऊ खोत बसले गप्प!

औरंगाबाद : कर्जमाफी अर्ज ऑनलाईन, बोंडअळी लागण झाली, ऑनलाईन अर्ज करा, प्रत्येक गोष्टिसाठी ऑनलाइन अर्ज भरा म्हणता. या ऑनलाईनमुळे शेतकरी परेशान झालाय.. अधिकारी फक्त मंत्री आले कि जमा होतात.. प्रत्यक्षात शेतावर येऊन कुणीही पाहणी करीत नाही. आम्ही काय आत्महत्या करायची का, असा जळजळीत सवाल बाळापूर येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांना सुनावले. औरंगाबाद येथे शनिवारी श्री. खोत यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी शहराजवळ असलेल्या बाळापूर शिवारात एका शेतावर भेट दिली असता तेथील शेतकऱ्यांनी हमीभावासह कर्जमाफी, भारनियमन आशा विषयावर प्रश्न विचारले. शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन सदाभाऊ खोत यांनी शांत बसने पसंत केले. यानंतर श्री. खोत यांनी बाळापूर गावातील मंदिरात जाऊन शेतकऱ्यांना मी, मंत्री असलो तरी आधी शेतकऱ्याचे पोरगं आहे, असे म्हणत गावकऱ्यांच्या टाळ्या मिळवल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com