agriculture news in marathi, farmers reacts on onion price in belgaon | Agrowon

बेळगावात संतप्त कांदा उत्पादकांची जोरदार निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

बेळगाव, कर्नाटक : कर्नाटकातील हुबळी - धारवाड, बंगळूर आणि महाराष्ट्रात कांद्याचे दर चांगले असताना बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) आवारात कमी दराने खरेदी सुरु असल्याच्या निषेर्धात आज (ता.24) जोरदार निदर्शने केली. तसेच गेटबंद आंदोलन करत टायर पेटवून निषेध नोंदविला. 

बेळगाव, कर्नाटक : कर्नाटकातील हुबळी - धारवाड, बंगळूर आणि महाराष्ट्रात कांद्याचे दर चांगले असताना बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) आवारात कमी दराने खरेदी सुरु असल्याच्या निषेर्धात आज (ता.24) जोरदार निदर्शने केली. तसेच गेटबंद आंदोलन करत टायर पेटवून निषेध नोंदविला. 

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हुबळी - धारवाड, बंगळूर व महाराष्ट्रात सोलापूरमध्ये सरासरी 2 हजार रुपये प्रतिक्विंटल कांद्याचे दर आहे. यातुलनेत बेळगावात प्रतिक्विंटल सहाशे ते आठशे रुपये कमी दराने खरेदी केली केली जात आहे. अन्यत्र चांगले दर मिळत असताना केवळ बेळगावात कांद्याचे दर कमी का, असा प्रश्‍न करत शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेतले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एपीएमसीजवळ शेतकरी जमले आणि त्याठिकाणी आंदोलन सुरु केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत गेल्यानंतर गेटबंद आंदोलन सुरु केले. शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला. काहींनी टायर पेटवून निदर्शने केली. त्यामुळे गोंधळ उडाला. आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. 

वाल्मिकी जयंती असल्याने शहरात मिरवणूक होती. त्यासाठी पोलिस बंदोबस्त होता. तसेच सांबरा विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांचे आगमन होणार होते. त्या ठिकाणीही पोलिस बंदोबस्त होता. पण, अचानक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलन ठिकाणी पोलिस कुमक वाढवली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...
मराठा आरक्षण : ज्येष्ठ विधिज्ञ हरीश...मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि...
जिनिंग मालकाने शेतकऱ्याला घ्यायला लावली...वर्धा : एका हातात पाण्याचा ग्लास आणि दुसऱ्या...
स्वतंत्र भारत पक्षाकडून ‘आपले सरकार’चा...नगर : राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची लूट करणारे...
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
साताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...