agriculture news in marathi, farmers registration status for procurement, nagar, maharashtra | Agrowon

नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी करण्यासाठी शासनाने ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये कालावधी कमी पडल्याने अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करता आली नाही. त्यामुळे पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला. मात्र वाढलेल्या कालावधीतही पुरेसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आतापर्यंत मूग, उडीद, सोयाबीनसाठी मिळून ४३३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी झाल्याचे सांगण्यात आले. आता तातडीने खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी होत आहे.

नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी करण्यासाठी शासनाने ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये कालावधी कमी पडल्याने अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करता आली नाही. त्यामुळे पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला. मात्र वाढलेल्या कालावधीतही पुरेसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आतापर्यंत मूग, उडीद, सोयाबीनसाठी मिळून ४३३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी झाल्याचे सांगण्यात आले. आता तातडीने खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाची हमीभावानुसार खरेदी करणे बंधनकारक असताना व्यापारी मात्र मालाचा दर्जा चांगला नसल्याचे कारण पुढे करत हमीभावाने शेतीमाल खरेदी करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीनसह अन्य शेतीमालाची हमीभावाने खरेदी व्हावी यासाठी शासनाने खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात होती.

जिल्हा मार्केटींग फेडरेशनने कृषी विभागाकडून उत्पादनाच्या शक्‍यतेची माहिती घेऊन खरेदी केंद्रे सुरू करण्याचे वरिष्ठांना कळवले होते. त्यानुसार कर्जत, जामखेड, नगर, नेवासा, राहाता, राहुरी, पारनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा, नेवासा येथे २५ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली. नोंदणीसाठी पंधरा दिवसांचा अवधी दिलेला असताना प्रत्यक्षात बुधवारपासून (ता. ३) नगरमध्ये नऊ ठिकाणी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.

काही ठिकाणी तर ५ तारखेपासून नोंदणी सुरू झाली. प्रत्यक्षात मात्र नऊ दिवस उशिरा नोंदणी सुरू झाली. त्यातही संकेतस्थळ सुरू होण्याला अडचणी येत असल्याने अनेक शेतकऱ्यांना नोदणी करता आली नाही. त्यामुळे नोंदणीची मुदत वाढवून ती २४ ऑक्‍टोबरपर्यंत वाढवण्यात आली. नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ४३३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी अजून आठ दिवसांचा कालावधी आहे. नोंदणी करून घेतली जात असली तरी अजून कोठेही खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. अजून साधारण आठ दिवस तरी केंद्रे सुरू होण्याला अवधी लागण्याची शक्‍यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...