agriculture news in marathi, Farmer's release for malnutrition Shevga seeds given gift | Agrowon

कुपोषण मुक्तीसाठी शेतकऱ्याने शेवगा बियाणे दिले भेट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

नाशिक  : कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास आपलाही हातभार लागावा या सामाजिक भावनेतून नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील ७५ वर्षाच्या एका शेतकऱ्याने सोमवारी (ता. १८) जिल्हा परिषदेत स्वखर्चाने ४० किलो शेवग्याच्या बिया अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचेकडे सुपूर्द केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या कुपोषण निर्मूलन मोहिमेस समाजातील सर्वस्तरातून पाठिंबा मिळत असून, कुपोषण निर्मूलनासाठी जिल्ह्यात लोकचळवळ निर्माण झाल्याचे अनिल लांडगे यांनी या वेळी सांगितले.

नाशिक  : कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास आपलाही हातभार लागावा या सामाजिक भावनेतून नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील ७५ वर्षाच्या एका शेतकऱ्याने सोमवारी (ता. १८) जिल्हा परिषदेत स्वखर्चाने ४० किलो शेवग्याच्या बिया अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचेकडे सुपूर्द केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या कुपोषण निर्मूलन मोहिमेस समाजातील सर्वस्तरातून पाठिंबा मिळत असून, कुपोषण निर्मूलनासाठी जिल्ह्यात लोकचळवळ निर्माण झाल्याचे अनिल लांडगे यांनी या वेळी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा परिषदेचे सूत्रे घेतल्यापासून कुपोषण या विषयाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. यासाठी जिल्ह्यात नव्याने सर्वेक्षण करून माहिती घेण्यात आली आहे. जिल्हाभरात तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांसाठी ग्रामस्तरावर बाल ग्राम विकास केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे.

कुपोषण निर्मूलनासाठी आहार तसेच औषध याबरोबरच गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालक यांचेसाठी शेवगा किती महत्त्वपूर्ण आहे, याबाबत डॉ. गिते यांनी माहिती देत जिल्हा शेवगामय करण्याचा निर्धार केला आहे. अंगणवाडी परिसर, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी शेवगा लागवड करण्यात येत आहे. यासाठी शेतकरी मोफत बियाणे उपलब्ध करून देत आहेत. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती मिळताच नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील शेतकरी श्रीराम धूत यांनी आपल्याकडील ४० किलो शेवगा बियाणे जिल्हा परिषदेला मोफत उपलब्ध करून दिले आहे.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात अनिल लांडगे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे आदींच्या उपस्थितीत श्रीराम धूम यांनी शेवगा बियाणे सुपूर्द केले.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...