agriculture news in marathi, farmers researcher Dadaji Khobragade passes away | Agrowon

प्रसिद्ध भातवाण संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 जून 2018

चंद्रपूर : प्रसिद्ध भात (धान) वाण संशोधक  दादाराव खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने रविवारी (ता.३) निधन झाले. भाताचे (धान) एक- दोन नव्हे, तर तब्बल नऊ वाण विकसित करण्याचा विक्रम करणाऱ्या आणि हजारो हेक्टरवर ज्यांच्या वाणांची लागवड होत आहे. त्यांच्या पश्च्यात मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.

चंद्रपूर : प्रसिद्ध भात (धान) वाण संशोधक  दादाराव खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने रविवारी (ता.३) निधन झाले. भाताचे (धान) एक- दोन नव्हे, तर तब्बल नऊ वाण विकसित करण्याचा विक्रम करणाऱ्या आणि हजारो हेक्टरवर ज्यांच्या वाणांची लागवड होत आहे. त्यांच्या पश्च्यात मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.

नागभीड तालुक्‍यातील नांदेड हे दादाजी खोब्रागडे यांचे गाव. जेमतेम तिसरीपर्यंत शिक्षण झालेले दादाजी १९८३ मध्ये तांदळाचे संशोधक म्हणून नावारूपास आले. परिस्थितीमुळे त्या वेळी त्यांना शिक्षण घेता आले नव्हते; परंतु त्यांनी कल्पकतेने आपले तांदूळ क्षेत्रातील संशोधन कार्य सुरू ठेवले. एच.एम.टी.सारखा शेतकरीभिमुख वाण त्यांनी विकसित केला. त्यानंतर आजवर त्यांच्या नावे नऊ वाण संशोधनाची नोंद आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ते तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यापर्यंत साऱ्यांनी त्यांचा सन्मान केला. 

८९ वर्षांच्या दादाजींना २०१५ मध्ये अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांनी आता खाणेपिणेही बंद केले होते. उपचारासाठी पैशाची सोय नसलेल्या धान वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांकडे गुरुवारी (ता. ३१) अकोल्यातील शेतकरी मित्र मंडळासह इतर संघटनांनी १ लाख २१ हजार रुपयांची मदत सोपविली. सरकारकडूनही मदतीची घोषणा झाली होती. नागपुरातील डॉ. सुहास कानफाडे यांच्या रुग्णालयात दादाजींवर उपचार सुरू होते.

फोर्ब्जने घेतली दखल
दीड एकर शेतीत संशोधनकार्य करणाऱ्या दादाजी खोब्रागडे यांच्या कार्याची दखल घेत २०१० मध्ये फोर्ब्जने जगातील सर्वोतम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना स्थान दिले होते. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ५० हजार रुपये तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरविले, तर राज्य सरकारने देखील त्यांचा कृषिभूषण पुरस्काराने सन्मान केला. 

राष्ट्रवादीने दिली पाच एकर शेती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या संशोधकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने त्यांच्या संशोधनकार्यासाठी पाच एकर शेती विकत घेऊन दिली. ही शेतीच त्यांच्या उपजीविकेचे साधन आजवर होती. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी नापिकीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांचा मुलगा मित्रदीप खोब्रागडे यांनी सांगितले. 

हे वाण केले विकसित
एच.एम.टी., विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एच.एम.टी. आणि डीआरके-२ अशाप्रकारचे नऊ तांदूळ वाण त्यांनी विकसित केले आहेत. 

 

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...