agriculture news in Marathi, Farmers responsibility after pesticide purchased, Maharashtra | Agrowon

कीडनाशक खरेदी करताना विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांवर जबाबदारी
विनोद इंगोले
मंगळवार, 3 एप्रिल 2018

यवतमाळ ः फवारणीदरम्यान विषबाधेने जिल्ह्यात २२ शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. याप्रकरणात कृषी सेवा केंद्र संचालकांवरदेखील गुन्हे दाखल झाले. त्यानंतर कृषी सेवा केंद्र संचालकांनी सावध पावित्रा घेत ‘कीटकनाशक खरेदीनंतरची जबाबदारी माझी’ अशा मजकुरावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेण्यास सुरवात केल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. 

यवतमाळ ः फवारणीदरम्यान विषबाधेने जिल्ह्यात २२ शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. याप्रकरणात कृषी सेवा केंद्र संचालकांवरदेखील गुन्हे दाखल झाले. त्यानंतर कृषी सेवा केंद्र संचालकांनी सावध पावित्रा घेत ‘कीटकनाशक खरेदीनंतरची जबाबदारी माझी’ अशा मजकुरावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेण्यास सुरवात केल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. या किडीचे नियंत्रणासाठी शिफारसीत नसलेल्या कीडनाशकाचा बेबंद वापर शेतकऱ्यांकडून करण्यात आला. शिफारस नसताना अनेक कीडनाशक एकत्रित करून त्यांचीही फवारणी केली गेली. यातून जिल्ह्यात ७००  पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाली. २२ शेतकरी, शेतमजुरांना या घटनेत जीव गमवावे लागले. विषबाधेच्या या घटनांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांनी यवतमाळकडे धाव घेतली. 

प्राथमिक चौकशीत कृषी सेवा केंद्र संचालकांकडूनच शेतकऱ्यांना ही कीडनाशके दिल्या गेल्याचे समोर आले. त्यामुळे काही कृषी सेवा केंद्र संचालकांची चौकशी तर काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले. महिनाभराच्या कालावधीत घडलेल्या या घडामोडींमुळे कृषिक्षेत्र पुरते हादरून गेले होते. कृषी विकास अधिकारी दत्तात्रय कळसाईत यांचे निलंबनही करण्यात आले. 

स्टॅंपवर शेतकऱ्याची सही
‘‘बिलामधील नमूद केलेली कीटकनाशके माझ्या मर्जीने मी घेतलेली आहे. त्यास फवारणीचे वापर करताना घ्यावयाची संपूर्ण दक्षतेबाबत मला माहिती दिलेली असून पुढील जबाबदारी माझी राहील. करिता सही करीत आहे.’’ अशा प्रकारचा मजकूर असलेले स्टॅम्पच पुसद तालुक्‍यात कृषी व्यावसायिकांनी तयार केले आहेत. कोऱ्या कागदावर असा मजकूर असलेला स्टॅम्प लावत त्यावर कीटकनाशक खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याची स्वाक्षरी घेण्यात येत असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

इतर अॅग्रो विशेष
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...