agriculture news in marathi, Farmers return the award | Agrowon

पशुपालकांनी केली पुरस्कार वापसी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

अमरावती : पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने आजारी जनावरांवर उपचार होत नाही. यामुळे जनावरे दगावल्याचा आरोप करीत आठ पशुपालकांनी त्यांना उत्कृष्ट पशुपालनासाठी मिळालेले पुरस्कार परत केले.

अमरावती : पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने आजारी जनावरांवर उपचार होत नाही. यामुळे जनावरे दगावल्याचा आरोप करीत आठ पशुपालकांनी त्यांना उत्कृष्ट पशुपालनासाठी मिळालेले पुरस्कार परत केले.

चांदूर बाजार येथील पंकज ऊर्फ गुड्डू मिश्रा यांच्याद्वारे देशी गोवंशाचे व्यवस्थापन होते. गेल्या दहा वर्षांपासून त्यांचे या व्यवसायात सातत्य असून जनावरांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी त्यांना अनेक स्पर्धांमध्ये गौरविण्यात आले आहे. परंतु स्थानिक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळे शेती उपयोगी जोडधंद्याला खीळ बसत असल्याचा आरोप गुड्डू मिश्रा यांनी केला आहे. पशुसंवर्धन अधिकारी शासनाकडून घरभाडे भत्ता घेतात, मात्र नियुक्‍ती असलेल्या गावात राहत नाही. याचा फटका गुड्डू मिश्रा यांच्यासह अनेक पशुपालकांना बसला.  

याविरोधात आठ पशुपालकांनी त्यांना मिळालेले पुरस्कार मंगळवारी (ता. २०) परत केले. सुरवातीला अमरावती विभागीय आयुक्‍त पीयूष सिंह यांच्याकडे ते पुरस्कार घेऊन गेले. परंतु आपल्या कार्यकक्षेत हे येत नसल्याचे सांगत या पशुपालकांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला विभागीय आयुक्‍तांनी दिला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद यांच्याकडे हे पशुपालक गेले.

श्री. अहमद यांनी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राहाटे यांना बोलावले. परंतु पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची बाब मानण्यास डॉ. रहाटे तयार नसल्याने यावेळी चांगलाच वाद झाला. अखेरीस पशुपालकांनी तेथेच पुरस्कार व त्यांना मिळालेले बक्षिसाचे ७० हजार रुपयांच्या रकमेचे धनादेश ठेवले आणि कक्ष सोडला.

यांनी केली पुरस्कार वापसी
पंकज मिश्रा, कांताप्रसाद मिश्रा, सोनिया मिश्रा, इमरान खान मुर्तजा खान, जीवन देशमुख, योगेश देशमुख, मनीष गणेशपुरे, नरेंद्र निर्मळ यांचा पुरस्कार परत करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. दरम्यान पशुपालकांनी वाद घातल्याचा आरोप करीत पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रहाटे यांनी पोलिसांत तक्रार दिल्याचे वृत्त आहे.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...