शेतकरी संघटना अधिवेशन : 'निसर्ग कमी, पण सरकार जास्त मारते`

बोंड अळीचा प्रादुर्भाव होणे हा काय शेतकऱ्यांचा दोष आहे का? बाहेर देशात बीटीची प्रगती आणि देशात मात्र बंदी हे धोरण कशासाठी. शेती तोट्यात, शेतमालाला दर नाही. इथल्या शेतकऱ्यांनी काय फक्त आत्महत्या करायच्या काय. - प्रकाश होणशेट्टे, बलदरा, ता. उमरी, जि. नांदेड.
शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात सहभागी शेतकरी.
शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात सहभागी शेतकरी.

शिर्डी, जि. नगर  : पोळ्यापासून पाऊस नाही, शेतकऱ्यांना जगायचे अवघड झाले. गावखेड्यातून पोटासाठी स्थलांतर सुरू आहे. शासन मात्र उपाययोजना करण्याऐवजी चेष्टा केल्यासारखे करते. सरकारला यांची किंमत मोजावी लागेल. सरकारचे चुकीचे धोरण शेतकऱ्यांचे वाटोळे करत आहे. निसर्ग कमी, पण सरकार जास्त मारते, अशी भावना शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शिर्डी येथे शेतकरी संघटनेचे तीनदिवसीय संयुक्त अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशानात राज्य आणि देशातून शेतकरी सहभागी झाले आहेत. गावाकडची परिस्थिती सांगताना कामनगाव (ता. भोकर, जि. नांदेड)  येथील मारूती सोळंके, शंकर बेल्लुरे येथील तरुण शेतकरी म्हणाले, की शेतीचा पेरा झाला नाही, शेती तर तोट्यात गेली, गावात रोजगार नाही. पोटासाठी लोक पुणे, मुंबई गाठत आहेत. आम्ही मिळेल तेथे रोजगार शोधत आहोत; सरकार फक्त घोषणा करतेय, बाकी काही देत नाही. जगावं कसं असा प्रश्न आहे.

 करवली (जि. परभणी ) येथील रामकिसन घाटुळ, डिग्रस (जि. हिंगोली) येथील विश्वनाथ गोरे म्हणाले, की सरकार नाफेडमार्फत खरेदी करण्याचे फक्त नाटक करत असून व्यापाऱ्याची खरेदी करतेय. निसर्ग कमी, पण सरकार जास्त मारते. शेतकरी आता या बाबींचा निश्चित विचार करणार आहे. संत्रा व मोसंबी पिकासाठी सरकार काहीच मदत करत नाही, असे मत वाशीमचे अनिल मालपाणी यांनी व्यक्त केले. मागील सरकारला कंटाळून शेतकऱ्यांनी या सरकारला निवडून दिले. पण या सरकारने शेतकरी वाऱ्यावर सोडले आहे. सरकारचे धोरण शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. शेतकरी आता याचा विचार करणार आहे. शेतकरी धोरणांवर निवडणुका व्हाव्यात, असे मत मातापूर (ता. श्रीरामपूर ) येथील बापूसाहेब आढाव यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com