शेतीपिकांना मोजूनच पाणी दिले पाहिजे ः डॉ. दि. मा. मोरे

शेतीपिकांना मोजूनच पाणी दिले पाहिजे ः डॉ. दि. मा. मोरे
शेतीपिकांना मोजूनच पाणी दिले पाहिजे ः डॉ. दि. मा. मोरे

पुणे ः पाणी ही संपत्ती आहे; पण ती मोजली जात नाही, त्यामुळे दारिद्र्य येत आहे. हे दारिद्र्य दूर करायचे असेल तर पिकांना मोजूनच पाणी दिले पाहिजे. त्यासाठी प्रवाही सिंचन पद्धती बंद केली पाहिजे, असे मत पाणी विषयाचे अभ्यासक डॉ. दि. मा. मोरे यांनी व्यक्त केले.

जागतिक जल दिनानिमित्त भारतीय जलसंस्कृती मंडळ व रेडिओ एफटीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलजागर २०१९’ या कार्यक्रमाचे शुक्रवारी (ता. २२) पुण्यातील सचिन तेंडुलकर जॉगिग पार्कजवळील इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रामध्ये आयोजन केले होते, त्या वेळी श्री. मोरे बोलत होते. 

या वेळी ‘जलसंवाद’चे संपादक डॉ. दत्ता देशकर, जलसंपदा विभागाचे माजी सचिव विद्याधर रानडे, रोटरीचे जलअभ्यासक सतीश खाडे, सहज जलबोधकार उपेंद्र धोंडे आदी उपस्थित होते. 

श्री. मोरे म्हणाले, ‘‘जलआराखाड्याचा अभ्यास करून पाण्याचा पुनर्वापर किती होऊ शकतो, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सिंचनाचा अभ्यास करताना पीकपद्धती खूप महत्त्वाची आहे. आधुनिक पद्धतीने सिंचन केले तर सिंचन क्षेत्रात वाढ होईल, त्यासाठी परिस्थितीला अनुकूल असलेल्या पीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. 

रोटरीचे जलअभ्यासक सतीश खाडे यांनी मार्गदर्शन केले. एफटीआयआयचे संजय चांदेकर यांनी प्रास्ताविक केले.

आजकाल भूजल पुनर्भरण अतिशय सोपे समजले जाते. खड्डे केले की पाणी आपोआपच जमिनीत मुरते असा भ्रम आहे. याशिवाय गावशिवारातील एकेक थेंब पाणी अडवून नदी वाहती करू, अशा पोकळ वल्गना केल्या जातात. तलावासारख्या जलसाठ्यांमुळे पाणी वाया जाते, असे समजून त्याकडे दुर्लक्ष होते. चारशे फुटांपेक्षा खोलवरचे पाणी हे पिण्यास अयोग्य आणि पुनर्भरणासही अशक्य हे सामान्य नागरिकांना माहिती नाही.  - उपेंद्र धोंडे, सहज जलबोधकार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com