मुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु
ताज्या घडामोडी
सांगली : डाळिंब पिकाने क्रांती केली आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता आली आहे. डाळिंब पिकासाठी शेतकऱ्यांनी स्वतः शास्त्रज्ञ बनले पाहिजे, असे मत डाळिंबतज्ज्ञ राजाराम यलपले-पाटील यांनी व्यक्त केले.
सांगली येथे दैनिक ॲग्रोवन प्रदर्शनास शुक्रवारी (ता. ५) प्रारंभ झाला. या वेळी फळ लागवड व निर्यातक्षम डाळिंब लागवडीचे तंत्रज्ञान या विषयाच्या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी शेतकरी उपस्थित होते.

राजाराम यलपले-पाटील म्हणाले, ‘‘आज महिलादेखील डाळिंबाची शेती उत्तमरीत्या करू लागल्या असून, ही बाब चांगली आहे. डाळिंब पीक हे श्रीमंतीचे लक्षण आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. डाळिंबाची लागवड करताना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार केली पाहिजे. विद्यापीठाच्या शिफारसीनुसार १० बाय १५ फूट अशी लागवड केली पाहिजे. यामुळे डाळिंबाची वाढ चांगली होते.
डाळिंब पीक हे उत्पन्न देणारे पीक असून, त्याची काळजी घेण्यासाठी योग्य नियोजन केले पाहिजे. विद्यापीठाने उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. याउलट विद्यापीठापेक्षा डाळिंबाच्या भगवा या नवीन वाणाचे संशोधन २५ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी केले आहे, त्यामुळे त्याचा विस्तार लगेच झाला.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘पश्चिम महाराष्ट्रात डाळिंबाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होतेय. आज डाळिंब शेतकरी स्वतः संशोधक आहेत. त्यांनी डाळिंबाचे पीक चांगले घेतले आहे. शेतीची लाइफस्टाइल बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे. शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकाचा अभ्यास न करता विविध पिकांचा अभ्यास केला पाहिजे. तसेच, शेतकऱ्यांनी प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन, शेतीचा अभ्यास केल्यास आपल्या शेतीतील पिकांचे उत्पादन वाढू शकते.
चर्चासत्रातील ठळक मुद्दे
- तरुणांनी शेतीच्या पिकाचे संशोधन करण्याची गरज
- विद्यापीठ आणि सरकारने प्रतिहेक्टरी उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत
- नवीन तंत्रज्ञान भारतात आले पाहिजे
- डाळिंब निर्यात करण्यासाठी पुढे यावे
- डाळिंब पिकासाठी खडकाळ व मुरमाड जमीन चांगली
- 1 of 143
- ››