agriculture news in marathi, Farmers stopped at Delhi-UP border; | Agrowon

शेतकऱ्यांच्या 'दिल्ली मार्च'ला पोलिसांनी रोखले
वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : संपूर्ण कर्जमाफी, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, थकलेले पेमेंट आदी मागण्यांसाठी राजधानी दिल्लीकडे 'लॉंग मार्च'च्या माध्यमातून कूच करणाऱ्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्ली-उत्तर प्रदेश सिमेवर पोलिसांनी पाण्याचा मारा करुन आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून रोखले. भारतीय किसान युनियन (बीकेयु) च्या नेतृत्वाखाली उत्तर भारतातील विविध राज्यातील हे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह दिल्लीकडे निघाले होते. 

नवी दिल्ली : संपूर्ण कर्जमाफी, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, थकलेले पेमेंट आदी मागण्यांसाठी राजधानी दिल्लीकडे 'लॉंग मार्च'च्या माध्यमातून कूच करणाऱ्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्ली-उत्तर प्रदेश सिमेवर पोलिसांनी पाण्याचा मारा करुन आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून रोखले. भारतीय किसान युनियन (बीकेयु) च्या नेतृत्वाखाली उत्तर भारतातील विविध राज्यातील हे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह दिल्लीकडे निघाले होते. 

शेतकऱ्यांचा 'दिल्ली मार्च' रोखण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडथळे निर्माण केले होते. मात्र ते बॅरिकेट्स मोडून शेतकऱ्यांनी अापली कूच सुरुच ठेवली. यावेळी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी न बधल्याने पोलिसांनी पाण्याचा मारा आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलनकर्त्यांना पांंगविण्याचा प्रयत्न केला. 

हरिद्वार येथून निघालेल्या या मोर्चाला राजधानी येण्यापासून प्रतिबंधीत करण्याकरिता पोलिसांनी अगोदरच १४४ कलम ८ अॉक्टोबरपर्यंत लावले होते. 

'सरकारच्या कृतीचा निषेध' 

गांधी जयंतीच्या दिवशी देशाच्या राजधानीत अन्नदात्या शेतकऱ्यांवर पोलीस बाळाचा वापर करून सरकारने हिंसेचा सहारा घेतला आहे. सरकारने असे करून सत्तेवर राहण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे. किसान सभा सरकारच्या या कृतीचा निषेध करत असल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी एका पत्रकाद्वारे म्हटले आहे.

डॉ. अजित नवले यांची प्रतिक्रिया...

डॉ. नवले म्हणाले, की सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. देशभर शांततेच्या मार्गाने वारंवार आंदोलने करून आपल्या व्यथा, मागण्या, अपेक्षा सरकार समोर मांडत आहे. सरकार मात्र प्रत्येक आंदोलनाच्या वेळी मागण्या मान्य करते, मान्य मागण्यांची अंमलबजावणी मात्र करण्यात येत नाही. शेतकऱ्यांचा वारंवार विश्वासघात करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या मनात यामुळे मोठा असंतोष खदखदतो आहे. आजच्या दिल्लीच्या आंदोलनाच्या निमित्ताने हा असंतोष व्यक्त झाला आहे.

वारंवार होणारा विश्वासघात, धोरणे ठरविताना केला जाणारा दुजाभाव व उपेक्षा  शेतकरी या पुढे सहन करणार नाहीत हा इशाराच या आंदोलनाने सरकारला दिला आहे.

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील 180 संघटना नोव्हेंबर महिन्यात लाखोंच्या संख्येने लॉंग मार्च काढणार आहेत. दिल्लीच्या चारही बाजूने चार लॉंग मार्च संसदेच्या दिशेने नेण्यात येणार आहेत. आजचे दिल्लीतील आंदोलन त्या विशाल लढयाची झलक आहे. सरकारने आता तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी व विश्वासघात करणे थांबवावे. अन्यथा विश्वासघाताची मोठी किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशारा डॉ. नवले यांनी दिला. 

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...