agriculture news in marathi, Farmers' strike begins in seven states | Agrowon

देशातील सात राज्यांत शेतकरी संपाला प्रारंभ
वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

नवी दिल्ली : राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या १० दिवसीय शेतकरी संपाला देशातील सातपेक्षा अधिक राज्यांत शुक्रवारी (ता. १) प्रारंभ झाला. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशासह विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. किसान महासंघाने शेतकरी कर्जमाफी, शेतीमालास योग्य दर, स्वामिनाथन समिती अहवाल शिफारसी अंमलबजावणी आदी मागण्या सरकारकडे केल्या आहेत. 

नवी दिल्ली : राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या १० दिवसीय शेतकरी संपाला देशातील सातपेक्षा अधिक राज्यांत शुक्रवारी (ता. १) प्रारंभ झाला. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशासह विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. किसान महासंघाने शेतकरी कर्जमाफी, शेतीमालास योग्य दर, स्वामिनाथन समिती अहवाल शिफारसी अंमलबजावणी आदी मागण्या सरकारकडे केल्या आहेत. 

पंजाब, हरियानात पुरवठा रोखला
चंदीगड : पंजाब आणि हरियाना राज्यातील महत्त्वाच्या शहरांना होणारा दूध आणि भाजीपाला पुरवठा शेतकरी आंदोलकांनी शुक्रवारी रोखत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. आम्हाला राज्यातील शेतकऱ्यांकडून संपाकरिता चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीरसिंग राजेवाल यांनी येथे दिली. किसान एकता मंच आणि राष्ट्रीय किसान महासंघ यांच्या वतीने १ ते १० जूनदरम्यान आम्ही आंदोलन करत आहोत. राज्यातील १७२ शेतकरी संघ, संघटना यात सहभागी झाल्या आहेत. 

मध्य प्रदेशात ‘गाव बंद’
भोपाल : मध्य प्रदेशसह देशातील २२ राज्यात ‘गाव बंद’ आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे समन्वयक शिवकुमार शर्मा यांनी येथे सांगितले. मंदसोर येथे पोलिसांची नजर आहे. शेतीमाल शहरात न आणण्याचे राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात अाले आहे. १० जूनला संपूर्ण भारत बंदची हाक देण्यात अाली आहे. 

संबळ जिल्ह्यात रोखला भाजीपाला
लखनौ : उत्तर प्रदेशातील संबळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शहरांकडे जाणारा भाजीपाला, दूध आणि इतर शेतीमाल रोखला आहे. ऊस, भाजीपाला, दूध आदी शेतीमाल्यास योग्य भाव मिळवा अशी आमची मागणी असल्याची माहिती भारतीय किसान युनियनेचे संजीव त्यागी यांनी बदरुला गावातील एका सभेप्रसंगी           सांगतले.

पश्‍चिम राजस्थानात धग
जयपूर : पश्‍चिम राजस्थानातील जिल्ह्यात शेतकऱ्यांनी १० दिवसीय देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून दूध आणि भाजीपाला रोखला आहे. शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालास योग्य दराची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पहिल्याच दिवशी सामान्य जनजीवनावर याचा परिणाम झाला नसला, तरी आंदोलनाची धार वाढण्याची शक्यता आहे. श्रीगंगानगर, हनुमानगड, झुंझुनू जिल्ह्यांत आंदोलनाची धग जाणवू लागली आहे. राष्ट्रीय किसान महासंघाचे कोअर समिती सदस्य संतवीर सिंह म्हणाले, की दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा आम्ही पुढील १० दिवस रोखणार आहोत. श्रीगंगानगर, हनुमानगड, झुंझुनूसह बिकानेर, सिक्कर आणि नागाैर जिल्ह्यांत आंदोलन तीव्र होईल, असे ते म्हणाले. किसान महापंचायत आणि किसान सभेने आंदोलनास नैतिक पाठिंबा दिला आहे.

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोग ठीक; पण शेतकरी आयोगाचे काय?१९४७ ते १९९० आणि १९९० ते २०१८ असे दोन भाग केले,...
वीजवापरातील ‘अंधार’वी ज दरवाढ तसेच शेती पंपासाठीची बिलं दुरुस्त करून...
परोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...
‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...
गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...
दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...