agriculture news in marathi, farmers struggle for survival of horticulture, akola, maharashtra | Agrowon

पातूर तालुक्यात टॅंकरने फळबागा जगवण्याची धडपड
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018
माझ्याकडे ३० एकरांत संत्रा, मोसंबी, पेरूची बाग अाहे. या फळझाडांना वाचवण्यासाठी दररोज टँकरने पाणी आणतो. दिवसभरात टॅंकरच्या पाच फेऱ्या होतात. एका टँकरमध्ये ८० ते ९० झाडांना पाणी देतो. आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते अाहे. सध्या एवढे पाणी आहे. आगामी दिवसांत यापेक्षाही भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता अाहे. मोर्णा धरणातून पाणी मिळावे, ही आमची मागणी आहे. 
- हिंमतराव टप्पे, संत्रा उत्पादक, कोठारी, जि. अकोला.
अकोला  : कमी पाऊस झाल्याचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो हे सध्या पातूर तालुक्यातील शेतकरी अनुभवत अाहेत. या तालुक्यातील कोठारी गावात पाणीच नसल्याने फळबागा टँकरच्या पाण्यावर जगविण्याची धडपड शेतकरी करीत अाहेत.   
 
पातूर तालुक्यातील मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोठारी गावात सुमारे ७० हेक्टरवर संत्रा लागवड अाहे. याशिवाय काही शेतकऱ्यांनी मोसंबी, पेरूची लागवड केली अाहे. दरवर्षी या गावातून सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक रकमेचा संत्रा बंगळूर, गुजरात, मुंबईसह स्थानिक बाजारात विकला जातो. अाज या संत्र्याच्या बागा टॅंकरच्या पाण्यावर जगविण्याची धडपड शेतकरी करू लागले अाहेत.
कुणी टँकरने पाणी अाणून देत अाहे, तर कुणी दिवसभरात १५ ते २० मिनिटे मिळणाऱ्या उपशाचे पाणी बागेला देत अाहे.
 
दररोज उन्हाची तीव्रता वाढत अाहे. पारा ४० अंशावर पोचला असून, पाण्याची गरज वाढत अाहे. कोठारी गाव मोर्णा धरणाच्या पायथ्याशी अाहे. या गावात आजवर जलसंपन्नता असल्याने फळबागांचा मोठा विस्तार झाला. एकाच गावात ७० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर संत्रा व इतर फळबागा उभ्या राहिल्या. संत्रा बागांमधून मागील अनेक हंगामात शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळाले.
 
या वर्षात कमी पाऊस झाल्याने अाधीच संत्र्याचा बहार फुटला नव्हता. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. ज्यांच्या बागेत बहार धरला त्यात अाता फळगळ होत अाहे. वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याची गरज भागवणे शेतकऱ्यांना हाताबाहेर गेले अाहे. या परिसरातील विहिरींनी तळ गाठला असून, दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढत चालले अाहे. 
 
कोठारी या गावाच्या दक्षिणेस अवघ्या चार किलोमीटर अंतरावर मोर्णा धरण आहे. या धरणातील पाणी संत्राबागा जगविण्यासाठी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे केली अाहे. 

इतर ताज्या घडामोडी
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...