agriculture news in marathi, Farmer's subsidy amount is short for water dam | Agrowon

शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम तोकडी
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 ऑगस्ट 2018

``मागेल त्याला शेततळ्याचे ५० हजार रुपये हे अनुदान फारच कमी आहे. आमच्या भागात मुरमाड जमीन असल्याने या अनुदानात शेततळे पूर्ण होत नाही. त्यामुळे शेततळ्याचे अनुदानात वाढ करायला हवी.``
- बसवराज कुंभार, उमदी, ता. जत.

सांगली : आमच्या भागात मुरमाड जमीन आहे. शेततळं घ्यायचं म्हटलं की लाखाच्या वर खर्च येतो अाहे. शासनाने मागेल त्याला शेततळ्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान दिले आहे. ही रक्कम तोकडी आहे. वरचा पैसा कसा उपलब्ध करायचा असा प्रश्‍न आमच्या समोर उपस्थित राहू लागला आहे. शेततळ्याच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी जत तालुक्‍यातील शेतकरी करू लागले आहेत.

शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना शेतकऱ्यांसाठी आखली आहे. यामुळे शेतीला शाश्‍वत पाण्याची सोय झाली. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

या तालुक्‍यात डाळिंब, द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तालुक्‍यात  ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पादक शेतकरी शेततळी घेण्याकडे कल अधिक आहे. शेततळे घेतल्याने पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. परंतु, ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत शेततळ्यासाठी केवळ ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते आहे. पण, ही योजना आखताना निधीच कमी केला आहे. मुळात पन्नास हजारांत ३० मीटर बाय ३० मीटर आणि ३ मीटर खोलीचं शेततळे कसं काढायचं असा प्रश्‍न आहे. जत तालुक्‍यात संपूर्ण तर कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्‍यांत ७० टक्‍क्‍यांहून अधिक माळरान आणि मुरमाड शेत जमीन आहे. त्यामुळे शेततळे काढण्यासाठी एक ते दीड लाख रुपयांच्या घरात खर्च आहे.

जत तालुक्‍यात गेल्या दोन वर्षांत १० हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी केवळ ६०० ते ७०० शेततळी झाली आहे. उर्वरित शेततळी मंजूर आहेत. मात्र, शेततळे काढण्याचा खर्च अधिक आहे. यामुळे शेततळे घेण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. शासनाने मागेल त्याला शेततळ्याचे अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणी सातत्याने केली आहे. मात्र, या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील ८१...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
शेतीमालावरील निर्यातबंदी हटवा;...सांगली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत...
अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीननवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
पुणे विभागात आडसाली ऊसाची ५१ हजार ६८०...पुणे  : जून, जुलै महिन्यांत पडलेल्या...
साताऱ्यात ‘जलयुक्त’मधून सोळा हजारांवर...सातारा  : जिल्ह्यात जलयुक्त शिवार...
वऱ्हाडात पावसाचे दमदार पुनरागमनअकोला  : मागील २० दिवसांपासून पावसाचा खंड...
जोरदार पावसामुळे दाणादाण; यवतमाळ...यवतमाळ  ः जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या...
ग्लायफोसेटवरील बंदीने शेतीवर संकट ओढवेल...पाउलो, ब्राझील ः कॅलिफोर्निया न्यायालयाने...
रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिकारांगडा हंगामात कांदा पिकापासून अधिक उत्पन्न...
डिजिटल साधनांचा निळा प्रकाश डोळ्यांसाठी...सध्या मोबाईल, लॅपटॉपसह डिजिटल साधनांचा वापर...
उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ,...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत....
मोठ्या आकाराचे जपानी मुळे हृदयरोग...गाजरे, कांदा आणि ब्रोकोली या भाज्यांसोबतच...
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...