agriculture news in marathi, Farmers' suicide due to government policy | Agrowon

सरकारच्या धोरणामुळेच शेतकरी अात्महत्या
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 डिसेंबर 2017

जळगाव : देशातील सरकारचे धोरणच शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, असा आरोप शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी बोदवड (जि. जळगाव) येथे शुक्रवारी (ता. १) सायंकाळी आयोजित शेतकरी सभेत केला.

जळगाव : देशातील सरकारचे धोरणच शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, असा आरोप शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी बोदवड (जि. जळगाव) येथे शुक्रवारी (ता. १) सायंकाळी आयोजित शेतकरी सभेत केला.

या वेळी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अभिमन्यू शेलकर, महिला आघाडीच्या सीमा नरोडे, सुकाणू समितीचे एस. बी. पाटील, संघनेचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे माजी अध्यक्ष कडूअप्पा पाटील, सय्यद अली असलम अली, ईश्‍वर लिधोरे, दगडू शेळके, मधुकर पाटील, राजू चौधरी, देवराम शेळके, दिलीप भावसार, प्रवीण मोरे, दामोदर पाटील, पुरुषोत्तम पाटील, राहुल वाघ, नाना पाटील आदी उपस्थित होते.

देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालेले नाही. तो संकटात आहे. नैसर्गिक फटका बसतो; पण कुठलीही मदत त्याला मिळत नाही. शेतकरी मेहनत करतो; पण त्याच्या मालाचे दर दुसरेच ठरवितात. त्याचे अर्थकारण कोलमडले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर संघटना रस्त्यावर उतरणार असून, त्याला न्याय मिळवून दिला जाईल. २०१९ ची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांच्या दृष्टीने महत्त्वाची असून, त्या दृष्टीने संघटना काम करील, असेही श्री. घनवट म्हणाले.

महिला आघाडीच्या सीमा नरोडे, एस. बी. पाटील व इतरांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. त्यात कपाशीला सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळावा, शेतकऱ्यांसाठी शिंगाडा मोर्चा काढणारे आता गप्प का, कपाशीला सात हजार भाव मागणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे आता गप्प का, असे प्रश्‍न उपस्थित केले.

१२ डिसेंबरला शेतकरी स्वातंत्र्य मेळावा

येत्या १२ डिसेंबर रोजी शेगाव (जि. बुलडाणा) येथे शेतकरी स्वातंत्र्य मेळावा आयोजित केला आहे. त्यात राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. शेतकरी आंदोलनाची दिशा व प्रश्‍न यासंबंधी ठोस भूमिका या वेळी घेतली जाईल, असे संघटनेने म्हटले आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...