agriculture news in Marathi, farmers suicide increased in Nashik District, Maharashtra | Agrowon

नाशिकमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आलेख चढाच
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 डिसेंबर 2017

नाशिक ः सरकारकडून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कल्याणकारी योजनांचा दावा केला जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आलेख उंचावताना दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत.

नाशिक ः सरकारकडून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कल्याणकारी योजनांचा दावा केला जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आलेख उंचावताना दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत.

चालू वर्षांत आतापर्यंत जिल्ह्यात 99 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून जीवनयात्रा संपवली आहे. राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. जुलै महिन्यात कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरसुद्धा 14 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांना दिलासादायक ठरलेली नाही. घेतलेले कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकरी जीवन संपवत आहेत, तर दुसरीकडे कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादी पडताळणीचे काम अजूनही संपलेले नाही.

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान विविध घोषणा करण्यात आल्या. सोबतच उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याच्याही वल्गना झाल्या. सिंचनाची व्यवस्था, सुरळीत वीजपुरवठा करणार, अशी ग्वाहीही दिली गेली.

मात्र तीन वर्षांनंतर वास्तव वेगळेच दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालास भाव मिळत नाही. या समस्या आजही कायम आहेत. त्या कमी व्हाव्यात म्हणून कर्जमाफीची घोषणा झाली. त्याला पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला. तरीदेखील बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफी लाभार्थ्यांच्या याद्या पडताळणीचे काम सुरू आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबरअखेर 99 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील 51 आत्महत्यांची प्रकरणे आर्थिक मदतीसाठी पात्र ठरली आहेत. उर्वरित 42 प्रकरणे अपात्र ठरली. 2016 या वर्षात 86 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यंदा त्यात 13 ने वाढ होऊन आतापर्यंत 99 शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. मालेगाव, निफाड, बागलाण, दिंडोरी या तालुक्‍यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

तालुकानिहाय आत्महत्या
नाशिक 3, बागलाण 13, चांदवड 10, सिन्नर 6, देवळा 1, दिंडोरी 11, मालेगाव 15, नांदगाव 11, निफाड 12, त्र्यंबकेश्वर 3, येवला 6, सुरगाणा 1, कळवण 7.
 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...