agriculture news in marathi, farmers suicide issue | Agrowon

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘किसान जिंदा प्लॅन’
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव यांसारख्या समस्यांना कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या समस्येतून शेतकऱ्यांस बाहेर काढण्यासाठी देवरगाव (ता. चांदवड) येथील तरुण शेतकरी विनायक शिंदे यांनी ‘किसान जिंदा प्लॅन’ ही संकल्पना तयार केली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी तयार केलेली संकल्पना केंद्र व राज्य सरकारने राबवावी, अशी मागणी केली आहे. 

शेतकरी वर्गाला कायमस्वरूपी आधार देणारी ही योजना असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या संकल्पनेवर गेल्या चार वर्षांत काम करीत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, ‘‘विविध समस्यांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.  

नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव यांसारख्या समस्यांना कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या समस्येतून शेतकऱ्यांस बाहेर काढण्यासाठी देवरगाव (ता. चांदवड) येथील तरुण शेतकरी विनायक शिंदे यांनी ‘किसान जिंदा प्लॅन’ ही संकल्पना तयार केली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी तयार केलेली संकल्पना केंद्र व राज्य सरकारने राबवावी, अशी मागणी केली आहे. 

शेतकरी वर्गाला कायमस्वरूपी आधार देणारी ही योजना असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या संकल्पनेवर गेल्या चार वर्षांत काम करीत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, ‘‘विविध समस्यांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.  

प्राथमिक गरजा पूर्ण करताना शेतकऱ्यांस संघर्ष करावा लागतो. या समस्येतून बाहेर काढण्यासाठी सरकारने ‘किसान जिंदा प्लॅन’च्या माध्यमातून १ लाख रुपयांपर्यंतची पत (क्रेडिट) शेतकऱ्यांस उपलब्ध करून द्यावी. शेतकरी या निधीतून आपल्या दैनंदिन गरज भागवतील. तसेच, योजनेतील कार्डाच्या माध्यमातून विशिष्ट वस्तूंच्या खरेदीसाठी मर्यादा निश्चित करता येईल.’’ 

‘‘अनेकदा पैसे नसल्याने किराणा, आजारपण, शेतीसाठी आवश्यक खते व साहित्य यांसाठी अडचण निर्माण होत असते. मात्र, या माध्यमातून पर्याय निघू शकतो. शेतमाल विक्री ऑनलाइन पद्धतीने केली जावी. यातून आलेले पैसे केलेल्या खर्चात वर्ग करून उर्वरित रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करता येईल,’’ असे शिंदे म्हणाले. 

‘‘अनेकदा शेतकरी अडचणीत असताना बँक व सोसायटीच्या माध्यमातून अर्थसाह्य घेतो. त्यामुळे व्याज भरताना त्याची दमछाक होते तर कधी अर्थसाह्यही मिळत नसल्याने तो मानसिक तणावात असतो. त्यामुळे या ‘किसान जिंदा प्लॅन’च्या माध्यमातून त्याला आधार होऊ शकतो,’’ असा विश्‍वास शिंदे यांनी व्यक्त केला.

‘किसान जिंदा प्लॅन’चे ठळक मुद्दे-

  • कर्जपुरवठ्याअभावी शेती अडचणीत येणार नाही
  • मूलभूत खर्चाकरिता भांडवल उपलब्ध
  • विशिष्ट व गरजेच्या वस्तूंची खरेदी 
  • क्रेडिट कार्डचा गैरवापर टाळणे शक्य
  • कार्डच्या माध्यमातून पिकांची ऑनलाइन नोंद
  • या माध्यमातून पिकांच्या लागवडीचा अंदाज येणार
  • शेतमालाचे आयात निर्यात धोरण ठरविणे शक्य
  • सरकारच्या तिजोरीवर ताण कमी होणार
  • शेतकरी यातून सक्षम होईल.
  • शेतकऱ्यांची विविध वित्तीय संस्थांकडून होणारी लूट थांबेल.

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...