agriculture news in marathi, farmers suicide in result of Development says laxmikant desmukh | Agrowon

शेतकरी आत्महत्या ही विकासाची कुरूप फळे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

नाशिक : शेतकरी आत्महत्येच्या घटना या विकास स्थितीची कुरूप फळे आहेत. अशा आत्महत्या रोखण्यासाठी विमा संरक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हायला हवा, असे मत बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येथे व्यक्त केले. 

नाशिक : शेतकरी आत्महत्येच्या घटना या विकास स्थितीची कुरूप फळे आहेत. अशा आत्महत्या रोखण्यासाठी विमा संरक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हायला हवा, असे मत बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येथे व्यक्त केले. 

मराठी साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांनी शेतकरी आत्महत्यांच्या विषयाबाबत ठोस पावले टाकण्याची गरज व्यक्त केली. देशमुख यांच्या जीवनाचा मोठा कार्यकाळ प्रशासकीय सेवेत गेला. श्री. देशमुख म्हणाले, की बालके, शेतकरी आणि महिला हे समाजातील महत्त्वाचे घटक असून, त्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. मी साहित्य संमेलनात या प्रत्येक विषयावर चिंतन व्यक्त करणार आहे. मागणी करूनही शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एकवेळ कोठे शिपाई म्हणून नोकरी करणारा मुलगा नवरा म्हणून चालेल; परंतु शेतकरी नवरा नको, असे मुली आणि त्यांच्या पालकांची भावना होत असेल तर ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. 

‘‘मुलांचे वय ३५ वर्षे होते, परंतु ते शेतकरी असल्यामुळे विवाह होत नसल्याचे वास्तव सभोवती पाहावयास मिळते. सरकार शेतपिके हमीभावाने खरेदी करणार नसेल तरी बाजारभावातील जो फरक निघेल तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करता येईल का, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. याखेरीज शेतकरी विमा अधिक व्यापक करायला हवा. या विम्याची किंमत फार नसून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत विमा योजनांचा प्रसार झाला तर शेतकरी आत्महत्या रोखण्यात काही प्रमाणात यश येईल,’’ असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. 

...तर परिस्थिती बदलेल 
हल्ली अनेक कंपन्या, सामाजिक संघटना ग्रामीण भागात समाजकार्य करीत असतात. त्यांनी काही गावे दत्तक घेऊन तेथील शेतकऱ्यांचा आणि पिकांचा विमा उतरविला तरी निश्चितच ही परिस्थिती बदलण्यास मदत होईल, असा विश्वास या वेळी देशमुख यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...