agriculture news in marathi, farmers take a decision to cultivation of paddy by machine, pune, maharashtra | Agrowon

यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा मावळातील शेतकऱ्यांचा निर्णय
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018

वडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड केली होती. यामुळे वेळ व श्रमात मोठी बचत झाली होती. भात उत्पादनातही वाढ झाली होती. त्यामुळे यंदाही यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्याचा निर्णय मावळातील भात उत्पादकांनी घेतला आहे. कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून यंदा भात लागवडीसाठी आम्ही तीन शेतकऱ्यांनी यंत्राची खरेदी केल्याची माहिती भात उत्पादक शेतकरी पुंडलिक जोरी यांनी दिली.

वडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड केली होती. यामुळे वेळ व श्रमात मोठी बचत झाली होती. भात उत्पादनातही वाढ झाली होती. त्यामुळे यंदाही यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्याचा निर्णय मावळातील भात उत्पादकांनी घेतला आहे. कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून यंदा भात लागवडीसाठी आम्ही तीन शेतकऱ्यांनी यंत्राची खरेदी केल्याची माहिती भात उत्पादक शेतकरी पुंडलिक जोरी यांनी दिली.

कृषी विभाग व ‘आत्मा’अंतर्गत कान्हेफाटा (ता. मावळ) येथील सेवाधाम ट्रस्ट येथे यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक अनिल देशमुख, तालुका कृषी अधिकारी विनायक कोंथिबिरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे,
कृषी अधिकारी उत्तम भांड, घनशाम अभंग, विकास धेंडे, नवीनचंद्र बोराडे, प्रगतशील शेतकरी बजाबा मालपोटे, काळूराम मालपोटे यांच्यासह परिसरातील भात उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

श्री. जोरी म्हणाले, की मी गेल्या वर्षी भात रोपवाटिका तयार केली होती. मात्र, एकाचवेळी लागवडी सुरू झाल्याने मजुरांची अडचण भासण्यास सुरवात झाली. त्यामुळे आम्ही यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला मनात शंका होत्या. प्रत्यक्षात लागवड करण्यास सुरवात केल्यानंतर यशस्वी झाल्याचे लक्षात आल्याने यंदाही भात लागवडीचा मी निर्णय घेतला आहे.

बजाबा मालपोटे म्हणाले, की आम्ही गटातील शेतकऱ्यांनी यंत्रामुळे लागवड केल्यामुळे खर्च कमी होऊन वेळेची बचत झाली. यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड केल्यामुळे भाताचे फुटवे चांगले मिळाले. साधारणपणे एकरी चाळीस क्विंटल भात उत्पादन मिळाले. यशस्वी उत्पादन मिळाल्याचे पाहिल्यानंतर परिसरातील  शेतकऱ्यांनी माझ्याकडे यांत्रिकीकरणाद्वारे यंदा भात लागवड करण्याची विचारणा केली आहे. यंदा आम्ही ‘आत्मा’च्या माध्यमातून आंदरमावळ परिसरात सुमारे शंभर एकरांवर भात लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी आम्ही २७ एकरांवर यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड केली होती.

अनिल देशमुख म्हणाले, की गेल्या वर्षी ‘आत्मा’च्या माध्यमातून शंभर एकरांवर भात लागवड करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या यांत्रिकीकरणाच्या योजनेतून मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्‍यात सात भात लागवड यंत्रे दिली आहे. यात मावळात तीन यंत्रे दिली आहे. यंदा यंत्राद्वारे भात लागवड करण्यासाठी भात उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात संमती दर्शविल्यास त्यांना ‘आत्मा’अंतर्गत शेतावर प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी यंत्रे घेतली आहेत, त्यांनी ही यंत्रे शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

या वेळी विनायक कोंथिबिरे यांनी प्रास्तविक केले. राहुल घोगरे यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...