agriculture news in marathi, Farmers take efforts to get transfarmer | Agrowon

रोहित्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

औरंगाबाद : वीज रोहित्राबाबत वर्षोगणती ''गरज तुमची फक्‍त साहित्य आमचं'' अस वागणं महावितरणंच असल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळे दैवयोगाने शेतकऱ्यांना जळालेलं वा मागणीनुसार मिळालेलं रोहित्र आणण्यासाठी वाहनाचा खर्च करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मुळात शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांची यासाठी नागवलं जात का, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो आहे.

औरंगाबाद : वीज रोहित्राबाबत वर्षोगणती ''गरज तुमची फक्‍त साहित्य आमचं'' अस वागणं महावितरणंच असल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळे दैवयोगाने शेतकऱ्यांना जळालेलं वा मागणीनुसार मिळालेलं रोहित्र आणण्यासाठी वाहनाचा खर्च करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मुळात शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांची यासाठी नागवलं जात का, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो आहे.

सध्या संपूर्ण मराठवाड्यातच सिंचनासाठी वीज नसल्याने शेतकऱ्यांची परवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बोंड अळीने कपाशीचे पीक गेल्याने त्याऐवजी गव्हाची पेरणी करून पीक घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशेत खंडीत वीजपुरवठ्याने खोडा घातला आहे. शेतकऱ्यांनी वीजबिल भरावे म्हणून योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रोहित्रांचा वीजपुरवठा खंडीत केला गेला आहे.

थकीत वीज देयकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हे पाऊल उचलल्या गेल्याचं यंत्रणेकडून सांगितलं जातं. मुळात खरीप हातचा गेल्याने यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बीवर लागून आहेत. अशात हजारो लाखोची वीज देयक भरायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. जे पेरलयं त्याला व पेराण्याची इच्छा असलेल्यांना पाण्याशिवाय पेरणी करणे शक्‍य होतांना दिसत नाही.

खंडीत वीजपुरवठ्यामुळे पैठण तालुक्‍यातील देवगावातील संतोष बोंद्रे, अशोक गिते, दीपक ढाकणे, नाथा ठोकळ यांच्यासह जवळपास दहा ते बारा शेतकऱ्यांची गव्हाची पेरणी रखडली आहे. या गावातील एका भागातील रोहित्र एक महिन्यापासून जळाले होते. ते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न केले.

परंतु दहा ते बारा शेतकऱ्यांनी जवळपास प्रत्येकी तीन हजार प्रमाणे पेसे भरल्याशिवाय त्यांना रोहित्र मिळाले नाही. रोहित्र देत असताना भरून घेतलेली रक्‍कम अपेक्षेप्रमाणे नसल्याने येत्या जानेवारीत अपेक्षित उर्वरीत रक्‍कम भरण्याचं वीज वितरण कार्यालयाने लिहून घेतल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

महिनाभरापूर्वी रोहित्र जळाल्यानं ते खटपट करून मिळवले. लाइनमनला सोबत घेऊन करमाडवरून ते आणले. त्यासाठी जवळपास चार हजार खर्ची घातले. रोहित्र बसविण्यासाठी लाइनमनला मदत म्हणून कसरत केली ती वेगळीच.
दीपक ढाकणे, शेतकरी देवगाव. ता. पैठण

दीड एकरातील कपाशी बोंड अळीनं संपली. त्याऐवजी गहू पेरायचा होता, पणं डीपी जळाला. त्यामुळे पंधरवड्यापासून गव्हाची पेरणी इच्छा असूनही करू शकलो नाही. डीपी मिळाला पण अजून लाइन सुरू व्हायची आहे.
- नाथा ठोकळ, देवगाव, ता. पैठण

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...