agriculture news in marathi, farmers in trouble Due cotton prize | Agrowon

कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळे
संतोष मुंढे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी सोबतच आल्याने मजुरांअभावी कापूस वेचणीचे दर प्रचंड वाढले आहेत. तुलनेत सुरू असलेल्या खासगी खरेदीत कापसाचे दर ३२०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलच्या पुढे सरकरण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न मिळविण्याच्या आशेवर पाणी फेरले जात आहे.

औरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी सोबतच आल्याने मजुरांअभावी कापूस वेचणीचे दर प्रचंड वाढले आहेत. तुलनेत सुरू असलेल्या खासगी खरेदीत कापसाचे दर ३२०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलच्या पुढे सरकरण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न मिळविण्याच्या आशेवर पाणी फेरले जात आहे.

कापसाच्या पहिल्या वेचणीवरून यंदा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी उत्पादन येणार हे स्पष्ट झाले आहे. आधी पावसाचा प्रदीर्घ खंड, त्यानंतर कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि आता परतीच्या पावसाने वेचणीला आलेला कापूस भिजत आहे. संकटाचा फेरा मराठवाड्यातील कापूस उत्पादकांचा पिच्छा सोडताना दिसत नाही.

मराठवाड्यात यंदाच्या खरिपात सरासरी १७ लाख १७ हजार ४५१ हेक्‍टरवर कपाशीचे क्षेत्र कृषी विभागाच्या लेखी गृहीत होते. सरासरीच्या ९१ टक्‍के क्षेत्रावरच अर्थात १५ लाख ६४ हजार ९४ हेक्‍टरवरच कपाशीची लागवड झाली. सुरवातीला ऐन कायिक वाढीच्या काळातच पाऊस बेपत्ता झाल्याने कपाशीची वाढ निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात घटली.

जवळपास तीन आठवड्यापर्यंत ढगाळ, दमट अर्थात कीड रोगांना पोषक वातावरणामुळे कपाशीवर रस शोषण करणाऱ्या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली.

यंदा कृषी विभागाने औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात सर्वदूर हेक्‍टरी सरासरी १४ क्‍विंटल ८८ किलो कपाशीची उत्पादकता प्रस्तावित केली होती. पहिल्या वेचनीतच निम्म्यापेक्षा जास्त घट झाल्याने अपेक्षित उत्पादकता गाठता येणे शक्‍य नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दुसरीकडे खासगी खरेदीदारांनी आपली खरेदी सुरू केली. परंतु शासनाकडून मात्र शेतकऱ्यांच्या कापसाला खर्चाला परवडतील असे दर मिळण्यासाठी पावले उचलली नसल्याने शेतकऱ्यांना आपला कापूस कवडीमोल दराने विकावा लागतो आहे. आधी निसर्गाने मारलेल्या शेतकऱ्यांना शासनाचे कपाशीसंबंधीचे धोरणही मारते की काय ही शंका शेतकऱ्यांच्या मनात घर करते आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...