नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम
ताज्या घडामोडी
मी पूर्वी तासाला पाचशे ते सहाशे रुपये देऊन नांगरट करून घेत होतो. परंतु डिझेलचे दर वाढल्यामुळे आता तासाला सातशे रुपये द्यावे लागतात.
- संतोष कारके, शेतकरी, डोणे, ता. मावळ, जि. पुणे
पुणे : दरवर्षी पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ होत असताना आता त्यात डिझेल, पेट्रोल दरवाढीची भर पडली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एेन रब्बी हंगामात आर्थिक ताळेबंद सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातच शेतीमालाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने चांगलाच तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
देशासह, राज्यात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, शेतकरीही चांगलेच हैराण झाले आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच बैलांच्या कमी संख्येमुळे शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळू लागले आहेत. बहुतांशी कृषी अवजारे ही इंधनावर चालतात. लवकरच रब्बी हंगाम सुरू होणार असून नांगरट करणे, यंत्राद्वारे पेरणी करणे, फवारणी करणे अशी अनेक कामे ट्रॅक्टरच्या साह्याने शेतकरी करतात. त्यासाठी डिझेल आणि पेट्रोलचा वापर होतो. मात्र, सध्या डिझेलचा दर प्रतिलिटर ७५ ते ८० रुपयांपर्यंत, तर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८५ ते ९० रुपयांपर्यंत गेला आहे. या दरवाढीमुळे शेतीला थेट फटका बसणार आहे. इंधनाचे दर वाढल्याने
जिल्ह्यात नांगरट करणे, रोटा मारणे, पेरणी करणे, सरी पाडणे, फवारणी करणे अशा विविध कामांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. अनेक यंत्रधारकांनी या दरामध्ये २०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ केली असल्याचे चित्र आहे. याशिवाय ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी डिझेल पंपाचा वापर केला जातो. त्यासाठी रोज पाच ते दहा लिटर डिझेल आवश्यक असते. मात्र, सातत्याने होणाऱ्या दरवाढीने हा खर्च वाढत चालला आहे. त्याचबरोबर शेतीमाल वाहतुकीच्या खर्चातही २०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते.
मी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ट्रॅक्टरद्वारे नांगरट, सरी पाडणे, पेरणी करण्याचा व्यवसाय करतो. त्यासाठी कमी दर घेत होतो. गेल्या पाच ते सहा महिन्यांत इंधनाच्या दरवाढीमुळे पूर्वीपेक्षा नांगरटीच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ केली आहे. सध्या सिंगल नांगरटीसाठी यापूर्वी १२०० रुपयांपर्यंत दर घेत होतो आता त्यात दीड हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे, असे बोरीबेल (ता. दौंड) येथील व्यावसायिक मंगशे मत्रे यांनी सांगितले.
- 1 of 348
- ››