agriculture news in marathi, farmers in trouble due to fuel price hike, varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडातील शेतकऱ्यांवर इंधन दरवाढीचा थेट परिणाम
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

मूग, उडदाचे एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन होत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी डिझेल दरवाढीमुळे आम्हा शेतकऱ्यांना धान्य तयार करण्याकरिता क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपये खर्च येत आहे. दुसरीकडे बाजारात धान्याला भाव नाहीत. हा ५०० रुपये खर्च फक्त थ्रेशरचा आहे. अन्य खर्च वेगळा लागत आहे. शेतकऱ्यांनी कसे जगावे हाच प्रश्न आहे.
- प्रभाकर मते,  शेतकरी, देगाव ता. बाळापूर जि. अकोला.

अकोला : वर्षभरात डिझेलचे दर सुमारे १५ रुपयांनी वाढल्याने त्याचा वऱ्हाडातील शेतकऱ्यांवर थेट परिणाम होत आहे. शेतीत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक यंत्राचा खर्च वाढला आहे. त्यातुलनेत एकाही शेतीमालाचा दर वाढलेला नसून गेल्या काळात मिळणारे भावसुद्धा सध्या नसल्याने परिस्थिती बिकट बनली आहे.

डिझेल दरवाढीमुळे शेतीत वापरले जाणारे ट्रॅक्टर, सिंचनासाठीचे डिझेल इंजिन, वाहतुकीचा खर्च वाढला आहे. ट्रॅक्टरचलीत मशागतीचा खर्च सरासरी एकरी १०० ते ३०० रुपयांदरम्यान वाढला आहे. थ्रेशरच्या साह्याने मळणी केली तर मागील हंगामापेक्षा किमान ५० ते १०० रुपये प्रतिक्विंटलमागे फटका सहन करावा लागतो. धान्य वाहतुकीसाठी वाहनचालकांनी अंतरानुसार सव्वा ते दीडपट दर वाढवले आहेत. भाजीपाल्याचीही वाहतूक करताना आधी एक क्रेट नेण्याचे दर १५ ते २५ रुपये होते. आता हाच दर २० ते ३५ रुपयांदरम्यान आकारला जात आहे. यामागे वाहनधारक डिझेल दरवाढीचे कारण देत आहेत.

शेतीची मशागत ट्रॅक्टरने करताना पंजी, वखरणी करण्यासाठी एक तासाला चार लिटर डिझेल लागते. रोटाव्हेटरसाठी ५ लिटर डिझेल लागते. सध्या डिझेल घरी आणेपर्यंत ते ८० रुपये प्रतिलिटर पडते. त्यामुळे ट्रॅक्टरवर प्रतितास १०० रुपये खर्च शिल्लक लागतो. वखरणीसाठी ६०० व रोटाव्हेटर १००० रुपये दर आहेत. शेतकऱ्यांना प्रतितास १५० ते २०० रुपये अधिक खर्च सहन करावा लागणार आहे. ओलितासाठी इंजिन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सहा तास इंजिन चालवण्यासाठी आता १२० रुपये अतिरिक्त लागतात, असे खुदनापूर (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील  निंबाजी लखाडे पाटील यांनी सांगितले.
 

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...