agriculture news in marathi, farmers in trouble due to irreguler power supply, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 एप्रिल 2018
मी मका, कलिंगड, टोमॅटो पिके घेतली आहे. महावितरणाकडून तीन दिवस दिवसा, तीन दिवस रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी येतात. शासन नुसत्याच घोषणा करते पण शेतकऱ्यांना आठ ताससुद्धा पूर्ण दाबाने वीजपुरवठा करीत नाही. 
- रघुनाथ शिंदे, शेतकरी, 
खैरेनगर, शिरूर, जि. पुणे.
पुणे  ः उन्हाचा चटका वाढल्यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासू लागली आहे. ऐन उन्हाळ्यात ग्रामीण भागात महावितरणकडून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे उभी पिके वाचविण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहेत. सध्या विजेच्या लपंडावामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झाले असून, पूर्ण दाबाने वीजपुरवठा केला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
 
शेतीसाठी बारा तास वीजपुरवठा करण्याच्या घोषणा शासनाकडून केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र या घोषणा हवेतच विरत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वीज बाराऐवजी फक्त आठ तासच दिली जात असल्याचे कागदोपत्री दिसून येते. प्रत्यक्षात या आठ तासांमध्ये विजेचा चांगलाच लपंडाव सुरू असतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
 
गेल्या पाच ते सहा वर्षे दुष्काळामुळे शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आले होते. मात्र, गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस, टोमॅटो, डाळींब, भाजीपाला आदी पिके घेतली आहे.  
 
यंदा उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी बाजरी, मका, भूईमूग आदी पिकांची लागवड केली आहे. याशिवाय ऊस, टोमॅटो, कलिंगड, डाळिंब, सिताफळ यांसह भाजीपाला पिके घेतली आहे. परंतु शहरातील नागरिकांकडून मागणी वाढली असल्याने ग्रामीण भागात शेतीसाठी कमी दाबाने पुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतीसाठी काही भागांत अवघे चार ते पाच तासच वीजपुरवठा केला जात आहे.
 
त्यामुळे इंदापूर, बारामती, शिरूर, खेड, इंदापूर, भोर, जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील काही भागांत पिके सुकत असल्याचे चित्र आहे. याविषयी इंदापूर येथील लक्ष्मण संगवे म्हणाले, की माझ्याकडे एकूण पाच एकर शेती आहे. त्यामध्ये तीन एकरावर डाळिंब, ऊस अर्धा एकर आहे. गव्हाची काढणी झाली आहे. महावितरण विभागाने आमच्याकडे आठ तासांचे वेळापत्रक दिले आहे. परंतु आठ तास वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे वीजपंप चालत नसून पिकांना पाणी देण्याचे नियोजन कोलमडत आहे. महावितरणने पूर्ण दाबाने शेतीसाठी वीजपुरवठा करावा अशी आमची मागणी आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजनग्रामीण भागात जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...
जळगावात भाजीपाला आवकेत घटजळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
पुणे जिल्ह्यात २२० हेक्टरवर भातपीक...पुणे  ः यंदाच्या खरिपात भात उत्पादनवाढीसाठी...
टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे...पुणे  : टाटा व कोयना धरणातील ११५ टीएमसी पाणी...
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...