agriculture news in marathi, farmers in trouble due to load shedding, jalgaon,maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी भारनियमनामुळे त्रस्त
चंद्रकांत जाधव
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

आमच्या भागात कृषिपंपांना दिवसा चार दिवस वीज मिळते. तीन दिवस मध्यरात्रीनंतर वीजपुरवठा होतो; पण वेळापत्रकानुसार वीजपुरवठा होत नाही. मध्येच वीजपुरवठा खंडित होतो. अनेकदा वीजपंप नादुरुस्त होतात. 

- घनश्‍याम भगवंतराव पाटील, शेतकरी, साकरे, जि. जळगाव.
जळगाव ः ऑक्‍टोबरमधील कडक उन्हामुळे जिल्ह्यातील पिकांना सिंचनाची गरज आहे; पण अशातच भारनियमन मध्येच खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वेळापत्रकानुसार वीजपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. 
 
जिल्ह्यात मागील आठ ते १० दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत आहे. केळी, कपाशी, तूर पिकाला सिंचनाची गरज आहे; पण वीज व्यवस्थित नसते. वीजपुरवठा मध्येच खंडित होतो, त्याचा फटका वीजपंपांना बसतो. धरणगाव, एरंडोल, जळगाव या तालुक्‍यात सोमवार ते गुरुवार असे चार दिवस दिवसा सकाळी १० ते ५ व शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस मध्यरात्रीनंतर दोन वाजेपासून ते सकाळी १० वाजेपर्यंत वीजपुरवठा केला जातो.
 
ज्या वेळेस कृषिपंपांना दिवसा वीज दिली जाते त्या काळात महावितरणतर्फे वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण केले जातात. मध्येच कुठलेतरी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद असतो. या काळात पंप बंद राहत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. रात्री वीजपुरवठा असतो, त्या काळात शेतकऱ्यांना मध्यरात्रीनंतरही जागे राहावे लागते. यातच मध्येच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पुन्हा कृषिपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्वीच (स्वयंचलित) यंत्रणा बसवून घेतली आहे. त्यासाठी त्यांना एक हजार रुपये व त्यापेक्षा अधिक खर्च आला आहे.
 
महावितरणने दुरुस्तीची कामे कृषिपंपांना वीजपुरवठा सुरू नसताना केली तर या काळात सिंचनाचे काम सुरळीत होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...