नाफेडच्या खरेदी केंद्रासाठी शेतकरी संघटनेचे धरणे

नाफेडच्या खरेदी केंद्रासाठी शेतकरी संघटनेचे धरणे
नाफेडच्या खरेदी केंद्रासाठी शेतकरी संघटनेचे धरणे

परभणी : बोरी (ता. जिंतूर) येथे नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी (ता. २८) शेतकरी संघटनेतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

बोरी बाजार समितीमधील व्यापारी कार्यक्षेत्रातील गावातून शेतमाल विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करून लूट करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिंतूर येथे नाफेडचे खरेदी केंद्र आहे; परंतु ते बोरी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावापासून दूर अंतरावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतूक खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ३५ हून अधिक गावांतील शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

तूर खरेदी हंगाम जवळ येऊन ठेपलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची सध्या होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख मारवाडीकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनामध्ये शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com