देशभरातील शेतकरी संघटनांचा स्वतंत्र राजकीय पक्ष

देशभरातील शेतकरी संघटनांचा स्वतंत्र राजकीय पक्ष

राष्ट्रीय किसान परिषदेच्या समारोपप्रसंगी रघुनाथदादा पाटील यांची पुण्यात घोषणा पुणे : देशभरातील शेतकरी संघटना नविन राजकीय पक्ष काढणार. नवी दिल्लीत घोषणा करणार, अशी घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांची राष्ट्रीय किसान परिषदेच्या समारोप प्रसंगी मंगळवारी (ता. १२) येथे केली. तसेच, देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी देशभर आंदोलन छेडणार असल्याचे श्री. पाटील यांनी जाहीर केले. ‘शेतकरी संघटने’तर्फे आयोजित ‘राष्ट्रीय किसान परिषदे’च्या समारोपप्रसंगी पाटील बोलत होते. परिषदेचा समारोप शनिवारवाड्यावर सभेने झाला. हुतात्मा बाबू गेनू आणि शरद जोशी यांच्या स्मरणार्थ ही परिषद घेण्यात आली. लालबहादूर शास्त्री यांचे नातू संजयनाथ सिंग, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, कर्नल सुरेश पाटील (निवृत्त), शेतकरी नेते लीलाधर राजपूत, समशेरसिंग दहिया, किशोर ढमाले, गणेश जगताप, सुश्‍मिता सोरेन, बलविंदरसिंग बाजवा असे २२ राज्यांतील शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.  यानिमित्ताने नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहापासून शनिवारवाड्यापर्यंत मोर्चा काढला. यात बैलगाडी आणि ट्रॅक्‍टरसह शेतकरी सहभागी झाले होते. हातात मशाल घेऊन आणि हलगी वाजवत शेतकऱ्यांनी आपले विविध प्रश्‍न मांडले. शनिवारवाड्यात झालेल्या सभेत शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटिसांची आणि वीज बिलांची होळी करण्यात आली.  श्री. पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या अवस्थेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. स्वतःची ‘मन की बात’ रेडिओवर बोलण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांची ‘दिल की बात’ ओळखली पाहिजे. शेतकऱ्यांच्या ‘मन की बात’ मोदी ओळखत नाही, तोपर्यंत ‘अच्छे दिन’ येणार नाहीत.’’ पाटील म्हणाले, ‘‘सर्वांगीण शिक्षण, सक्षम कायदे आणि शेतीला मुबलक पाणी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यासाठी पुण्यातील तरुण उपोषणही करणार आहेत. सरकारचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com