agriculture news in marathi, farmers unions on hard stand regarding sugarcane rates, Solapur | Agrowon

सोलापूरात ऊसदराबाबत संघटना आंदोलनावर ठाम
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पंढरपूर, जि. सोलापूर  ः ऊसदर आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर साखर कारखानदार, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये समन्वय बैठक झाली. बैठकीसाठी कारखानदारांनी पाठवेल्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कायम ठेवली आहे. 

पंढरपूर, जि. सोलापूर  ः ऊसदर आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर साखर कारखानदार, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये समन्वय बैठक झाली. बैठकीसाठी कारखानदारांनी पाठवेल्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कायम ठेवली आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून स्वाभिमानी, बळिराजा, रयत आदींसह इतर विविध शेतकरी संघटनांनी जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी या वर्षीच्या उसाला पहिली उचल तीन हजार ४०० रुपये जाहीर करा; मगच कारखाने सुरू करा, असा इशारा दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी स्वतःहून तोडी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही साखर कारखानदारांनी ऊसतोडी सुरू करून संघटनांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातूनच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार सुरू झाले आहेत.

दुसरीकडे पंढरपूर तालुक्‍यातील काही कारखानदार बळाचा वापर करून ऊसतोडी सुरू करत असल्याने संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपासून भीमा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये आंदोलनाने पुन्हा जोर धरला आहे. आंदोलनादरम्यान तालुक्‍यात कुठेही अनुचित किंवा हिंसक प्रकार घडू नयेत, यासाठी आज येथील पंचायत समितीच्या सभागृहात सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

बैठकीमध्ये सुरवातीला श्री. पिंगळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हिंसक आंदोलन न करता सनदशीर मार्गाने आंदोलन करा. कायदा हातात घेऊन जर कोणी आंदोलन करत असेल, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी मंत्री समितीच्या बैठकीत जो निर्णय होईल त्यानुसार दर जाहीर केला जाईल, असे सांगितले. त्यावर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून पहिली उचल जाहीर करावी, अशी मागणी लावून धरली; मात्र दर जाहीर करण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.   

बैठकीसाठी विठ्ठल कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे शेती अधिकारी संभाजी थिटे, पांडुरंगचे कारखान्याचे रमेश गाजरे, वसंतराव काळे कारखान्याचे श्री. काझी, शहर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, तालुका पोलिस निरीक्षक कृष्णकांत खराडे, रयत शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक भोसले, बळिराजाचे जिल्हा अध्यक्ष माउली हळणवर, माउली जवळेकर, शहाजन शेख, स्वाभिमानीचे नवनाथ माने, विजय रणदिवे, तानाजी बागल, महिला आघाडीप्रमुख विश्रांती भुसनर, मेजर महादेव नागटिळक आदींस पदाधिकारी उपस्थित होते.  

इतर ताज्या घडामोडी
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे विदर्भातील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे...अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील सहावे बक्षिस...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
नाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट...``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन...
अन्य सस्तनापेक्षा उंदराची विचार...दृष्टी किंवा दृश्यावर आधारीत समस्या सोडविण्यासाठी...
आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते...नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी...
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत...पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक...
कोय, भेट पद्धतीने फळझाडांचे कलमीकरणआंब्याची अभिवृद्धी कोय कलम, पाचर कलमांद्वारे केली...
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी...सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला...
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध...जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी...
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरलेइगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी...
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाहीनाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने...
सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
वीज वितरण यंत्रणा दुरुस्तीसाठी ७५००...नागपूर   : राज्यातील वीज वितरण करणाऱ्या...
परभणीतील पीकविमा परतावाप्रश्नी ठोस...परभणी : पीकविमा परतावाप्रश्नी ठोस तोडगा निघत...
किसान सभा,शेतकरी संघर्ष समितीचा दूध...नाशिक  : दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा,...
मंत्री जानकर यांची दूध दरवाढीत एजंटशिप...कऱ्हाड, जि. सातारा : दुग्ध विकास व...
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची...पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये...
कपाशी नुकसानीपोटी मराठवाड्यासाठी ४०७...औरंगाबाद  : गुलाबी बोंड अळीच्या...