agriculture news in marathi, The farmers of Vidarbha Planting Kesar Methi | Agrowon

विदर्भात कसुरी मेथी लागवडीचा प्रयोग
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 मार्च 2018

नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाच्या बळावर अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्‍यात सुमारे ३० गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर कसुरी मेथी लागवडीचा प्रयोग करण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला विभागाचे प्रमुख डॉ. श्याम घावडे यांचे मार्गदर्शन या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना मिळत आहे. विदर्भात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे.

नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाच्या बळावर अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्‍यात सुमारे ३० गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर कसुरी मेथी लागवडीचा प्रयोग करण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला विभागाचे प्रमुख डॉ. श्याम घावडे यांचे मार्गदर्शन या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना मिळत आहे. विदर्भात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे.

कसुरी मेथी (Trigonella conriculata L.) हे पीक बिहार व राजस्थानच्या उत्तरी भागात घेतले जाते. या पिकाकरिता थंड हवामानाची गरज भासते. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये (रब्बी हंगामात) याची लागवड होते. मसालावर्गीय पिकात मसाले बियाणे पीक म्हणून याचा अंतर्भाव होतो. राष्ट्रीय स्तरावर "पुसा कसुरी'' हे वाण यापूर्वी प्रसारित झाले असून, याशिवाय इतर वाण विशेष प्रसिद्ध नाहीत. याच्या पानाला विशिष्ट सुगंध असल्याने मसाला व मांसाहारी भाज्यांमध्ये याच्या वाळलेल्या पानाचा  उपयोग केला जातो.

साध्या मेथीपेक्षा याचे बियाणे लहान आकाराचे राहते. एकरी ४०० ते ५०० ग्रॅम बियाण्यांची गरज भासते. कसुरी मेथीला मागणी आहे. खासगी मसाले कंपन्या सध्या याचे ब्रॅंडिंग करतात. त्यानुसार २५ ग्रॅमच्या पाकिटाला २० रुपये मोजावे लागतात. शेतकऱ्यांनादेखील हे पीक चांगला फायदा मिळवून देऊ शकते, ही बाब लक्षात घेत कृषी विद्यापीठाने संशोधनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. दोन ओळींतील अंतर, बियाणे आणि काढणीपश्‍चात प्रक्रिया या विषयीची माहिती विद्यापीठ शेतकऱ्यांना देईल. सध्या विद्यापीठ प्रक्षेत्रावर याचे प्रयोग घेण्यात आले. त्यानुसार वाळलेल्या पानाचे एकरी ६ क्‍विंटल उत्पादन मिळाले होते.

शेतकऱ्यांनी केली लागवड
मूर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्‍यातील अरुण बोंडे यांनी सात गुंठे, राजू वानखडे तसेच कृषी अधिकारी लहाने यांच्यासह काही शेतकऱ्यांनी थोड्याथोड्या क्षेत्रावर हे पीक लावले आहे. सुमारे ३० गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्र या पिकाखाली आहे. बीजोत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांद्वारे प्रस्तावित असून, प्रक्रिया करून कसुरी मेथी विकण्याचे प्रस्तावित आहे. चक्रपाणी बचत गटाच्या माध्यमातून लवकरच पॅकिंग करून ते विकले जाईल.

अशी करावी लागते प्रक्रिया
कसुरी मेथी कडवट असल्याने साध्या मेथीप्रमाणे थेट खाता येत नाही. हिरवी पाने तोडून उकळत्या पाण्यामध्ये १ ते २ मिनिटे सोडली जातात. नंतर पाण्यातून काढत ती सावलीत दोन ते तीन दिवस वाळविली जातात. वाळलेल्या पानांचा हिरवा रंग कायम राहणे गरजेचे राहते. अशा पानांना बाजारात मागणी राहते, असे डॉ. श्याम घावडे यांनी सांगितले. या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या व्यवसायिक पिकाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...