agriculture news in marathi, farmers vote, Market committee, pune | Agrowon

शेतकरी मतदारांसाठी बाजार समित्यांचे प्रयत्न
गणेश कोरे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

पुणे : बाजार समिती निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्यात आल्याने आगामी निवडणुकांसाठीची तयारी बाजार समिती सभापती आणि संचालकांनी सुरू केली आहे. तयारीचा भाग म्हणून शेतकरी मतदार कसे करता येतील याकडे विद्यमान संचालकांनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त शेतमाल बाजार समित्यांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

पुणे : बाजार समिती निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्यात आल्याने आगामी निवडणुकांसाठीची तयारी बाजार समिती सभापती आणि संचालकांनी सुरू केली आहे. तयारीचा भाग म्हणून शेतकरी मतदार कसे करता येतील याकडे विद्यमान संचालकांनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त शेतमाल बाजार समित्यांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

नीरा बाजार समितीने सासवडचा किरकाेळ फळबाजार बंद करून उपबाजार आवारात सुरू करण्याचा निर्णय घेतला अाहे. लवकरच या ठिकाणी फळांचा घाऊक बाजारदेखील सुरू हाेणार आहे. यामुळे बाजारात फळे घेऊन येणारे शेतकरी आपाेआप मतदार हाेणार असून, फळांच्या आवकेमुळे बाजार समितीच्या उत्पन्नातदेखील वाढ हाेणार आहे.

तसेच मागणीनुसार आता शेतकऱ्यांचा शेतमाल व विशेषतः फळे खरेदी-विक्री ही सासवड उपबाजार आणि नीरा बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात होईल. याचा फायदा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळण्यास हाेईल, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय गाडेकर यांनी सांगितले.

बाजार समितीच्या या निर्णयाचे शेतकरी संघटनेने स्वागत केले अाहे. संघटनेचे तालुका पदाधिकारी दिलीप गिरमे यांनी उपबाजारात फळ भाजीपाल्याची खरेदी विक्रीसाठी सुविधा देण्याची मागणी केली. यानंतर बाजार समितीने ९ ऑक्‍टोबर राेजी सासवडचा घाऊक फळबाजार बाजार समितीमध्ये सुरू होईल, असे जाहीर केले.

सासवडला नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपआवारात सध्या धान्य खरेदी होते, तर नीरा बाजार आवारात गूळ खरेदी होते. मात्र ताजा शेतमाल खरेदीची व्यवस्था कुठेच नाही. त्यामुळे सासवडला ताजा शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिली खरेदी ही फळांची घाऊक बाजारात होईल.

यात सहभागी व्यापाऱ्यांना परवाना देण्याचा प्रयत्न राहील. तर मार्केट यार्डातील शेतकरी सुविधा वाढविण्यात येणार आहे. तसेच भविष्यात दिवे (ता. पुरंदर) येथे सर्व साेयींयुक्त उपआवार सुरू करण्यात येईल, असेही सभापती गाडेकर यांनी सांगितले.

बारामती बाजार समितीचे सभापती रमेश गाेफणे म्हणाले, ‘‘शेतकरी मतदार व्हावेत यासाठी बाजार समिती काही प्रयत्न करत नाहीत. मात्र शेतकरी याबाबत जागरूक झाला असून, आपल्या कुटुंबीयांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी स्वतःच्या नावाबराेबरत कुटुंबीयांच्या नावाने शेतमाल पाठवीत अाहेत. मात्र करार शेती, वाट्याने शेती करत असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार याबाबत साशंकता अाहे.’’

हिशेबपट्टीचे प्रमाण वाढले ः काळे
जिल्ह्यातील तालुका बाजार समित्यांमध्ये सर्वांत माेठ्या असणाऱ्या जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे म्हणाले, ‘‘शेतकरी जागरूक झाला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने शेतकरी कुटुंबीयांच्या नावावर शेतमाल विक्रीसाठी पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हिशेबपट्टी शेतकरी कुंटुंबीयांच्या नावावर हाेत असल्याचा बदल माेठ्या प्रमाणावर जाणवत आहे.’’

 

इतर बातम्या
खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात अटक...नागपूर : राज्यातील झोपी गेलेल्या सरकारला जागे...
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
थंडी पुन्हा परतण्याची चिन्हेपुणे : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गायब झालेली...
कापूस उत्पादकांना एकरी २५ हजारांची मदत...नागपूर : बोंडअळीमुळे कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांचे...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
कारखान्यांपुढे शॉर्ट मार्जिनचे संकटकोल्हापूर ः गेल्या तीन महिन्यांपासून साखरेच्या...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
मावळातील शेतकऱ्यांची इंद्रायणी भाताला...कामशेत, जि. पुणे ः मावळ तालुक्‍याची ओळख असलेला...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
"स्वामिनाथन'बाबत पुन्हा सर्वोच्च...पुणे : शेतीमालाचा उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के...
अन्नसुरक्षा मुद्दाच भारतासाठी महत्वाचा ब्युनाॅर्स अायर्स, अर्जेंटिना : येथे होत असलेल्या...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
कर्जमाफी, यवतमाळ विषबाधा,...नागपूर : ऑनलाइन कर्जमाफीतील घोळ, पाच...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
सोयाबीनच्या दर्जेदार बीजोत्पादनासाठी...महाराष्ट्राचे प्रमुख पीक म्हणून कापूस व सोयाबीनचा...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
कोणताही पक्ष, सरकार, शेतकऱ्यांना न्याय...शेतकरी प्रश्‍नांबाबत रघुनाथदादांची खंत आजपासून...
नगर जिल्ह्यात बोंड अळीने साडेतीनशे...नगर : उसाचे क्षेत्र असेलल्या नगर जिल्ह्यामध्ये...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...