agriculture news in marathi, Farmers wait for rain, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 जून 2018

पुणे  : जिल्ह्यात पूर्ववमोसमी वादळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील सरासरी पावसाचा विचार करता जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील दुष्काळी पुरंदर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शिरुर, मुळशी तालुक्यांसह जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

पुणे  : जिल्ह्यात पूर्ववमोसमी वादळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील सरासरी पावसाचा विचार करता जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील दुष्काळी पुरंदर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शिरुर, मुळशी तालुक्यांसह जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच पुरंदर तालुक्याच्या सर्वच भागांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. तेथे जून महिन्याचा पहिल्या दहा दिवसांत ८० मिमी पाऊस पडला आहे. शिरूरमध्ये ७.१ तर मुळशीमध्ये १८.३ मिमी पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दुपारनंतर ढग दाटून येत पाऊस पडत आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत खरिपाच्या पेरण्यांची तयारी सुरू अाहे. मात्र, अनेक ठिकाणी पेरण्यांसाठी पुरेसा पाऊस झालेला नाही.

शिरूर, मुळशीत पाऊस नसल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. मात्र, एखादा दुसरा अपवाद वगळता अद्यापही पाऊस झालेला नाही. आधीच भूजलपातळी खाली गेल्याने तलाव, विहिरी, कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे उभी पिके डोळ्यांदेखत जळून चालली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची तयारी केली.

मुळशी, मुळशीसह पश्‍चिम भागांतील तालुक्यांमध्ये भात रोपवाटिकांची कामे सुरू झाली असून काही ठिकाणी भाताची रोपे वाढीच्या अवस्थेत असून, जोरदार पावसाची आवश्‍यकता आहे. भाताची रोपांची वाढ खुंटली असून, रोपे जळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतरही पाऊस हुलकावणीच देत असल्याने सध्या तरी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
 

जिल्ह्यात १ जून ते ९ जून दरम्यान पडलेला पाऊस (मिमी)

तालुका   पडलेला पाऊस  टक्केवारी दिवस
हवेली ४९.७ ४६.३
मुळशी   १८.३  ७.८
भोर ५४.८ ३९.५
मावळ २८.६ १५.२
वेल्हे  ६०.२ १४.४
जुन्नर  ३१ ३०.७
खेड ४८.२ ४८.६
आंबेगाव ५४.४ ४८.३
शिरूर ७.१ ६.६
बारामती ३७.७ ४८
इंदापूर  ४५.५  ४९.३
दौंड  २८.५ ३५
पुरंदर ८०.६ ९०.९

 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...