agriculture news in marathi, farmers waiting for compensation, akola, maharashtra | Agrowon

बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान दिवाळीपूर्वी मिळालेच नाही
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी नुकसान अनुदान जिल्हा यंत्रणांना मिळाले खरे मात्र सलग सुट्या व दप्तरदिरंगाईचा फटका यावेळीही बसला. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळेल, अशी अपेक्षा असताना अद्यापही वितरण सुरू झालेले नाही. अधिकारी-कर्मचारी सुट्यांवरून परतल्यावरच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा होईल.  

अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी नुकसान अनुदान जिल्हा यंत्रणांना मिळाले खरे मात्र सलग सुट्या व दप्तरदिरंगाईचा फटका यावेळीही बसला. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळेल, अशी अपेक्षा असताना अद्यापही वितरण सुरू झालेले नाही. अधिकारी-कर्मचारी सुट्यांवरून परतल्यावरच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा होईल.  

मागील वर्षात बोंड अळीमुळे झालेल्या कपाशी पीक नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने अनुदान जाहीर केले होते. हे अनुदान टप्प्याटप्प्याने दिले जात अाहे. शिवाय अालेल्या निधीचा वाटप हा इंग्रजी वर्णमालेनुसार केला जात अाहे. अाधी प्राप्त झालेले दोन टप्पे वितरित झाले. वऱ्हाडातील शेतकऱ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यात सुमारे ९५ कोटींचा निधी दिवाळीपूर्वी वर्ग करण्यात अालेला अाहे. यात अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार, बुलडाणा जिल्ह्यासाठी ४४ कोटी ७८ लाख ३६ हजार अाणि वाशीम जिल्ह्यासाठी ५ कोटी १२ लाख ५८ हजारांचा निधी होता.

शासनाने एक नोव्हेंबरला कापूस, धान उत्पादकांसाठी तिसऱ्या टप्प्याचा निधी अमरावती, नागपूर, अौरंगाबाद, नाशिक या विभागांना पाठवला. त्याला अाता जवळपास १० दिवसांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. जिल्हा यंत्रणांकडून तालुक्यांना व तेथून बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा केले जाणार अाहे. अनुदानाचा तिसरा टप्पा मिळण्यापासून हजारो शेतकरी सध्या वंचित राहलेले अाहेत.

किमान हा निधी तातडीने मिळाला तर रब्बीसाठी शेतकऱ्यांना फायदेशीर झाला असता. सोमवारपासून (ता. १२) शासकीय कार्यालये पूर्ववत झाली अाहेत. मात्र अाठवड्याच्या पहिल्या दिवशी शासकीय कार्यालयांमध्ये जेमतेमच उपस्थिती दिसत होती. शिवाय दिवाळी सुट्यांचा ‘मूड’सुद्धा कायम होता. मध्यंतरी बँकांनाही सुटी असल्याने निधी मिळण्यास अडथळे निर्माण झाले. या अाठवड्यात हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यांची खातरजमा केल्यानंतर वळती करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात अाले.

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...