agriculture news in marathi, farmers waiting for compensation, amaravati, maharashtra | Agrowon

तिसऱ्या टप्प्यातील ६१ कोटींची अमरावतीतील शेतकऱ्यांना प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

अमरावती  ः बॅंकांकडून कर्जास टाळाटाळ झाली असतानाच आता बोंड अळीच्या भरपाईपोटी तिसऱ्या टप्प्यातील ६१ कोटी रुपयांची मदतही रोखण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. अमरावतीला ६१ कोटी देण्यात आले नाही मात्र यवतमाळला ११६ कोटी तर चंद्रपूरला  ५९ कोटी रुपयांचा निधी याचवेळी मिळाल्याने या दुजाभावाबात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अमरावती  ः बॅंकांकडून कर्जास टाळाटाळ झाली असतानाच आता बोंड अळीच्या भरपाईपोटी तिसऱ्या टप्प्यातील ६१ कोटी रुपयांची मदतही रोखण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. अमरावतीला ६१ कोटी देण्यात आले नाही मात्र यवतमाळला ११६ कोटी तर चंद्रपूरला  ५९ कोटी रुपयांचा निधी याचवेळी मिळाल्याने या दुजाभावाबात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जमाफीच्या धोरणात सातत्याने बदल करीत शासनाने शेतकऱ्यांचा नुसता छळवाद लावला होता. कर्जमाफीच्या निकषात दरदिवशी बदल करीत सुधारित शासकीय परिपत्रक काढले जात असल्याने बॅंकादेखील संभ्रमात होत्या. त्यामुळे कर्जमाफीचा पुरता फज्जा उडाल्याने अनेक बॅंकांनी पात्र शेतकऱ्यांना देखील कर्जास नकार दिला. त्यामुळे खरिपाची सोय करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. त्याच अडचणीत आता बोंड अळीच्या तिसऱ्या टप्प्यातील भरपाई रोखल्याने नव्याने भर पडली आहे.

तिसऱ्या टप्प्यात मदतीपोटी ६१ लाख रुपयांची मागणी अमरावती जिल्ह्याची आहे. परंतु ती न देता यवतमाळ जिल्ह्याकरिता ११६ कोटी तर अर्थमंत्र्यांच्या जिल्हा असलेल्या चंद्रपूरकरिता ५९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यास यापूर्वी ११८ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते, हे विशेष. अमरावती जिल्ह्यातील ६१ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण २ लाख शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...