agriculture news in marathi, farmers waiting for compensation, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 मार्च 2018
जळगाव  ः जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अद्यापपर्यंत फक्त ९६ लाख रुपये एवढी रक्कम त्यांना भरपाईसाठी जाहीर झाली आहे. ३८४४ शेतकरी गारपिटीने बाधित झाले. शासकीय स्तरावर या शेतकऱ्यांची अडचण, नुकसान दुर्लक्षितच असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 
 
जळगाव  ः जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अद्यापपर्यंत फक्त ९६ लाख रुपये एवढी रक्कम त्यांना भरपाईसाठी जाहीर झाली आहे. ३८४४ शेतकरी गारपिटीने बाधित झाले. शासकीय स्तरावर या शेतकऱ्यांची अडचण, नुकसान दुर्लक्षितच असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 
 
१० व ११ फेबुवारीला जिल्ह्यातील काही भागांत गारपीट व किरकोळ पाऊस झाला होता. जामनेर तालुक्‍यातील फत्तेपूर, वाकोद, पहूर आदी भागात अधिक नुकसान झाले होते; तर जळगाव तालुक्‍यातही १४५ हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला. मुक्ताईनगरातील १० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. 

गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी जिल्ह्याला तीन कोटी रुपयांची मदत मिळणे गरजेचे होते; परंतु अद्याप ९६ लाख रुपये भरपाईपोटी जाहीर झाले आहेत. ही रक्कम जिल्हा प्रशासनाकडे येईल आणि त्यानंतर तिचे वितरण होईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांची माहिती जमा करून एकत्रितपणे रक्कम संबंधित बॅंकेत दिली जाईल. बॅंक ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करील. या प्रक्रियेत आणखी दीड महिना कालावधी जाईल, अशी माहिती मिळाली.

जिल्ह्यात गारपिटीत केळी पिकाचे सुमारे १५०, गव्हाचे सुमारे ९००, मक्‍याचे जवळपास ८५० हेक्‍टरवर नुकसान झाले. नुकसान एवढे झाल्याचा अंदाज होता; परंतु भरपाई मात्र तोकडी आल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे अजय बसेर यांनी दिली आहे. 

गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जाहीर झालेला आहे. हा निधी प्राप्त व्हायचा आहे. जिल्हा प्रशासनाकडे हा निधी आल्यानंतर संबंधित तालुक्‍यांना दिला जाईल. तालुकास्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात हा निधी गोळा केला जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

जळगाव तालुक्‍यात १२० हेक्‍टरवरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज होता; परंतु प्रत्यक्ष पंचनामे करताना केळी व इतर पिकांचे कुठेही ५० टक्‍क्‍यांवर नुकसान आढळले नाही. त्यामुळे जळगाव तालुक्‍यातील सुरवातीला नुकसानीत गृहीत धरलेले क्षेत्र वगळले आहे. त्यामुळे जळगाव तालुक्‍यातील काही भागाचा अपवाद वगळला तर कुणालाही मदत मिळणार नसल्याची माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...
जैविक शेती मिशन राबविण्यास प्रारंभअकोला ः शासनाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या डॉ....
जळगावसह रावेर मतदारसंघ भाजपकडेच?जळगाव ः आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना व...
किसान लाँग मार्चला जाणाऱ्या शेतकऱ्यांना...धुळे  : किसान लाँग मार्चमध्ये सहभागी...
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...